Wednesday, April 24, 2024
Homeभंडाराअनाधिकृत शाळा "महर्षी विद्या मंदिर" सुरूच

अनाधिकृत शाळा “महर्षी विद्या मंदिर” सुरूच

शिक्षणाधिकारी जि. प भंडारा यांचा आशीर्वाद * शिक्षण उपसंचालकाचे पत्रास केराची टोपली
भंडारा :


महर्षी विद्या मंदिर बेला ह्या इंग्रजी माध्यमाचे शाळेत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम २०११ ची अमलबजावणी होत नाही. तथा शाळा अनाधिकृतपणे स्थलांतरित केली असल्यामुळे या शाळेची मान्यता आपोआपच रद्द होते. त्यामुळे शासनाने १८ सप्टेंबर २०२० दिलेली परवानगी तथा फेब्रुवारी २००४ रोजी एनओसी करिता केलेली शिफारस रद्द करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांचेशी शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी पत्र व्यवहार केला असल्याची बाब शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना माहिती असून सुद्धा अर्थकारणामुळे शाळा बंद करण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता मधुकर देशमुख यांनी केला असून अनाधिकृत शाळा असल्याचा सूचना फलक शाळेचे दर्शनी भागात लावण्याची मागणी केली आहे.
इंग्रजी माध्यमाचे शाळेत पाल्यास शिकविणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण समजण्यात येते. त्यामुळे या शाळांतील भौतिक सुविधांना भुलून अनेक पालक या शाळांबाबद कसल्याही प्रकारची माहिती न घेता. पाल्यांना प्रवेश मिळवितात. त्यामुळे ह्या इंग्रजी माध्यमांच्या शाळाकडून अवाजवी शुल्क आकारणी केली जाते. महर्षी शिक्षण संस्था नवी दिल्ली द्वारा संचालीत महर्षी विद्या मंदिर बेला(भंडारा) येथे नर्सरी ते इयत्ता १२वी पर्यंत अंदाजे २५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही शाळा सुरुवातीला भाड्याचे इमारतीत होती. त्यानंतर संस्थेने स्वतःची सुसज्ज इमारत तयार करून नवीन इमारतीत शाळा स्थानांतरित केली. पण शिक्षण विभागाची परवानगी घेतली नाही. त्यामुळे या शाळेची मान्यता आपोआपच रद्द होते. असे शिक्षण उपसंचालक यांनी पत्र क्रमांक १३१९/२०२० मध्ये नमूद केले आहे.
महर्षी विद्या मंदिर बेला येथे अनेक प्रकारच्या अनियमितता असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार शिक्षण उपसंचालक नागपूर यांचे आदेशान्वये भंडारा जिल्हा परिषदेचे निरंतर शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी सविस्तर चौकशी केली असता. महर्षी विद्या मंदिर बेला येथे महाराष्ट्र शैक्षणिक संस्था(शुल्क विनियमन) अधिनियम २०११ ची अमलबजावणी होत नसल्याचा १२ फेब्रुवारी २०२१ रोजी शिक्षण उपसंचालकांना अहवाल पाठविला. त्यानुसार शिक्षण उपसंचालक नागपूर यांचे पत्र क्रमांक प्राथ/ब-२/१३१९/२०२० दिनांक १ मार्च २०२१ ला अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई-३२ यांना पाठविलेल्या पत्रानुसार महर्षी विद्या मंदिर बेला , जिल्हा भंडारा. या शाळेत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था(शुल्क विनियमन) अधिनियम २०११ ची अमलबजावणी होत नाही. तसेच शाळा अनाधिकृतपणे स्थानांतरित केली आहे. त्यामुळे शाळेची मान्यता आपोआपच रद्द होते. त्यामुळे शासनाने दिलेली परवानगी आदेश क्रमांक व्हि.एल.एस/१०००/(५०९/२०००)/(१) दिनांक १८ सप्टेंबर २००० आणि एनओसी ४००४/३५४/१००४एसई१ दिनांक फेब्रुवारी २००४ रद्द करण्याची शिफारस करण्यात आली. ही बाब शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना माहिती असताना महर्षी विद्या मंदिर ही अनधिकृत शाळा बंद करण्याचे कसलेही प्रयत्न केले नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता मधुकर देशमुख यांनी केला असून शाळेसमोर अनाधिकृत शाळा असल्याचे सूचना फलक लावण्याची मागणी केली आहे.
प्रतिक्रीया/स्टेटमेंट(चौकट)
महर्षी विद्या मंदिर बेला(भंडारा) शाळेची चौकशी आणि शिफारस रद्द करण्याच्या बाबतीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचेकडे प्रकरण चालू आहे. निर्णय अजून यायचा आहे.
संजय डोर्लीकर शिक्षणाधिकारी(माध्यमिक) जि. प. भंडारा

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular