गोंदिया :
वैद्यकीय ज्ञान आणि डॉक्टरांची कार्यकुशलता यामुळे अनेकदा मरणासन्न व्यक्तीं चे ही प्राण वाचले आहे. अशा अनेक घटना वैद्यकीय इतिहासात नमूद आहेत. काही महिन्यापूर्वीच कॅन्सर पेनकि‘याज गोळ्याची शस्त्रकि‘या झालेल्या महिलेची जोखमीची प्रसूती सामान्य पद्धतीने करण्यात गोंदिया शहरातील सावंत मॅटरनिटी व लाईफ लाइन रुग्णालय कुडवा येथी ल डॉक्टरांना यश आले आहे उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी महिला व तिच्या बाळाचे जीव धोक्यात असल्याचे सांगून तिच्यावर उपचार करण्यास काही डॉक्टरांनी नकार दिला होता.
रुग्णालयाच्या स्त्री रोग तज्ञ डॉ. धवल सावंत यांनी अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या महिलेची जोखमीची प्रसूती सामान्य पद्धतीने केली. त्यासाठी डॉक्टरांची कसोटी पणाला लागली. यात आई व बाळ दोघेही सुरक्षित आहेत. तिरोडा तालुक्यातील गराडा येथील रसिला दिनेश मेश्राम ही 24 वर्षीय महिला कॅन्सर पेनकि‘याज गोळ्यामुळे त्रस्त होती. तिच्यावर काही महिन्यापूर्वीच शस्त्रकिया करण्यात आली होती. त्यानंतर कुडवा येथील मॅटरनिटी व लाईफ लाइन रुग्णालयामध्ये प्रसूतीकरिता आली. तिची अवस्था अत्यंत गंभीर होती. त्यापूर्वी काही डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांना तिला नागपूरला हलविण्याचा स‘ा दिला होता. काही डॉक्टरांनी माता आणि बाळाच्या जीवाला धोका असल्याचे सांगून तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला होता. त्यातच आई व बाळाच्या जीवाला धोका असतानाही डॉ. धवल सावंत यांनी त्या महिलेची कठीण व जोखमीची प्रसुती करण्याची जबाबदारी घेतली. महिलेला रुग्णालयात भरती करवून घेत उपचारातुन सामान्य प्रसूती केली. यावेळी मात्र प्रसूती सामान्य करण्यात डॉक्टरांची कसोटी पणाला लागली. आता माता आणि तिचे नवजात बाळ सुखरूप आहेत. त्यांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले आहे. सामान्य व सुखरूप प्रसुती झाल्याने मेश्राम कुटुंबियांनी डॉ. सावंत यांचे आभार मानले.