——————————————————————-
पंचायत समीतीत समीकरण बदलण्याची शक्यता
कुही- 8/10/2021
तालुक्यात 35 वर्षात पहील्यादाच बसपाचे देवानंद गवळी विजयी झाल्याने पंचायत समीती कुहीत बसपाची दमदार एंट्री झालेली आहे
कुही पंचायत समीतीत भाजप ची सत्ता होती आता ह्या नीवडणुकीत भाजपने सील्ली पंचायत समीती गमावली तीथे कांग्रेस चे जयश्री कडव विजयी झाल्या तर कांग्रेस ने तारणा पंचायत समीती गमावली तीथे बसपाचे देवानंद गवळी वीजयी झाले
आता कुही पंचायत समितित भाजप कडे 4, कांग्रेस कडे 3 तर बसपा 1 असे पक्षीय बलाबल आहे स्पष्ट बहुमत कोणत्याच पक्षाकडे नसल्याने सत्तेचे समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवीली जात आहे अशा परीस्थीतीत पस्तीस वर्षात पहील्यादाच एन्ट्री करणार पक्ष म्हणजे बसपा ला गोल्डण चान्स मीळू शकतो अशी आशा बसपाचे तरुण तुर्क अध्यक्ष शुभम खोब्रागडे यांनी व्यक्त केली
प्रत्येकवेळा पंचायत समीती,जी प, विधानसभा व लोकसभा नीवडणुकीनंतर कुही तालुक्यातील बसपा कार्यकर्त्याना आमचे उमेद्वाराला कीती मते मीळाली व कीती वोटींग पर्सेंटेज वाढले यावर समाधान मानावे लागायचे मात्र 35 वर्षात पहील्यांदाज विजय पहावयास
त्यामुळे कार्यकर्त्यामधे अत्याधीक आनंदाचे वातावरण असल्याचे बसपाचे जेष्ट नेते डी टी रामटेके,देवानंद उके,सचीन मेश्राम,जगदीश सोनटक्के , हलमारे, हरीशचंद्र खोब्रागडे,नीतीन घरडे,यांनी व्यक्त केले
कुही- देवानंद गवळीयांचे विजयाचा जल्लोष करताना बसपाचे कार्यकर्ते