कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत दुचाकी वाहन चोरी चे प्रमाण वाढल्याने पोलीस अधिक्षक यांच्या आदेशा नुसार नागपुर ग्रामिण स्थागुअ शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पथकाने कन्हान परिसरात पेट्रोलिं ग करीत असतांना गोपनीय बातमी दाराकडुन खात्री शीर माहिती मिळाल्याने स्थागुअ शाखा नागपुर ग्रामि ण पथकाने दुचाकी व अँक्टीवा दुचाकी वाहन चोरीचे दोन आरोपीना पकडुन त्यांचा ताब्यातुन चार दुचाकी वाहन व दोन अँक्टीव्हा वाहन असे सहा वाहना सह २,२०,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पुढील कार वाई कन्हान पोलीसाच्या स्वाधिन करण्यात आले.
पोलीस सुत्रा कडुन प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.१३) डिसेंबर ला स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथक कन्हान परिसरात पेट्रोलिंग करी त असतांना गोपनीय बातमी दाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली कि, आरोपी १) पंकज पांडुरंग टुल्ले वय ३२ वर्ष राह. शिवाजी नगर झोपडपट्टी महाल नाग पुर यांचा कडे चोरीची अँक्टीव्हा दुचाकी वाहन असुन तो सध्या टेकाडी पुला जवळ एका मित्रा सह उभा आहे. त्यावरून अपराध शाखा पथकाच्या पोलीसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दोन इसम पांढऱ्या रंगाच्या अँक्टीव्हा दुचाकी वाहनासह टेकाडी पुलाच्या खाली उभे असतांना त्यांचे जवळ जावुन विचारपुस केली. त्यांनी आपले नावे आरोपी १) पंकज पांडुरंग टुल्ले वय ३२ वर्ष राह. शिवाजी नगर झोपड पट्टी महाल नागपुर , २) रितु इंद्रजीत पुरे वय ३२ वर्ष राह. संताजी नगर कांद्री कन्हान असे सांगितल्याने पोलीसांनी त्यांचा ताब्यातील वाहना बाबत विचारपुस केली असता आरोपींनी वाहना बाबत उडवा उडवीचे उत्तराने पोलीसांचा संशय वाढल्याने आरोपींना ताब्या त घेऊन सखोल विचारपुस केली असता आरोपी १) पंकज पांडुरंग टुल्ले यांनी सांगितले कि, त्याचे ताब्या तील अँक्टीवा वाहन ही त्याने एकट्याने नागपुर शहर येथील बर्डी जवळुन दिवाळी सणाचे वेळी चोरी केल्या चे कबुल केले व नागपुर शहर येथुन वेगवेगळ्या पोस्टे च्या हद्दीतुन चार वाहन चोरी केल्याचे कबुल केले व आरोपी २) रितु इंद्रजीत पुरे सोबत पोस्टे कन्हान हद्दी तील मौजा खोपडी येथुन काळ्या रंगाची अँक्टीव्हा वाहन चार महिन्यापुर्वी चोरी केली होती. ते वाहन आरोपी २) रितु इंद्रजीत पुरे हा वापरत होता. आरोपी २) रितु इंद्रजीत पुरे याने पोलीसांना सांगितले कि, तो मागच्या महिन्यात अँक्टीव्हा दुचाकी वाहन घेवुन गहु हिवरा गावाकडे फिरत असतांना त्यास कन्हान पोली सांची गाडी दिसल्याने ते गाडी टाकुन पळुन गेला अशी कबुली दिली. या वरून अपराध शाखेच्या पथकाने वाहनाची माहिती घेतली असता पोस्टे कन्हान येथील पोहवा श्रावणकर, नरेश वरखडे, नापोशि राहुल रंगारी, सुधीर चव्हान यांनी सदर वाहन हे (दि.१६) डिसेंबर २०२१ ला पोस्टे कन्हान येथे लावारिस मध्ये नोंद केली होती. आरोपी १) पंकज पांडुरंग टुल्ले यांनी पोस्टे नागपुर येथून विविध वाहन चोरी केल्याने त्याची जप्ती पंचनामा कारवाई करून व प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथुन दोघांचाही वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीय कारवाई करण्याकरिता कन्हान पोलीसांच्या स्वाधिन केले. सदर कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक श्री विजयकुमार मगर, अपर पुलिस अधीक्षक राहुल माखणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान, स्थागुअ शाखा नागपुर ग्रामिण पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनिल राऊत , पोहवा विनोद काळे, ज्ञानेश्वर राऊत, अरविंद भगत, नापोशि शैलेश यादव, सत्या कोठारे, पोशि प्रणयसिंग बनाफर, विरेंद्र नरड, चालक साहेबराव काळे आदीने शिताफीने कारवाई यशस्विरित्या पार पाडली. पुढील कारवाई कन्हान पोस्टे चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोहवा नरेश वरखडे हे तपास करीत आहे.