सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.
भगवान चांदेकर उमरी प्रतिनिधी
सावनेर-09 ऑक्टोंबर 2021
सावनेर-रामटेक महामार्गावरील सिमेंट रोड बनलेले आहे पण काही काही छोट्या-मोठ्या गावा ठिकाणी 100 ते150 मी. सिमेंटरोड न बनवल्याने तेथील पॅचेस तसेच सोडून दिलेले आहेत.त्यामुळे त्या रोडच्या ठिकाणी मोठमोठे 3 फुटापर्यंत खड्डे पडलेले असून या महामार्गावर प्रवास करणे कठीण झालेले आहे.या गंभीर बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिवघेणा ठरत आहे महामार्गावरील खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघात झाले असून बांधकाम विभागाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत कां ?असा सवाल या भागातील नागरिकांनी केला आहे.
खापा,कोथुळणा,सावळी,दहेगाव ते पारशिवनी पर्यंतचा मार्ग हा नेहमीच नागरिकांसाठी त्रास दायक ठरलेला आहे.प्रवासी वाहनांसह प्रवाशांना त्रासदायी ठरत असुन सततच्या पावसामुळे मार्ग उखळत चालला आहे. यामुळे पावसाचे पाणी साचुन मोठमोठे खड्डे पडले आहेत.या खड्ड्यात पाणी साचुन राहत असल्याने कित्येक अपघात झाले आहेत.अपघातात जीवितहानी झालेली असून तर अनेकांना अपंगत्व आले आहे.अशा दैयनिय मार्गामुळे व वाहनांना अडथळा निर्माण होत असल्या कारणाने परिवहन महामंडळाच्या बस फेऱ्या बंद पडल्या असुन विद्यार्थी,पालक,शेतकरी व शासकीय कार्यालयीन कामांना विलंब होऊन अनेकांचे नुकसान होत आहे.हा महामार्ग मध्यप्रदेश मध्ये जाणाऱ्या महामार्गाला जूळतो.
मागील दोन वर्षांपासून या मार्गाचे काम करण्यात आले.मात्र अभियंते व ठेकेदारांच्या दर्जाहीन आणि गुनवता नसलेल्या कामाचा परिणाम मार्ग उखडु लागलेला आहे.या क्षेत्राचे लोकप्रतिनिधींनी,स्थानिक लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे या भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.