पाठिंबा म्हणून शाखा सिर्सी च्या वतीने सहयोग यात्रेचे आयोजन
विदर्भ कल्याण / पुंडलिक कामडी

सिर्सी: भजन मंडळाचे शासनातर्फे मानधन वाढावे या मागणीसाठी संत भिकाराम फाउंडेशन चे राष्ट्रीय सचिव श्री. राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली सेवाग्राम ते मुंबई असा पायदळ प्रवास सुरु झालेला आहे. भजन कलावंतांना ५ हजार रुपये मासिक मानधन मिळावे, वयोमर्यादा ५० वरून ३० वर्ष करण्यात यावी तसेच इतर जाचक अटी शिथिल करण्यात यावा याकरिता या पायदळ सत्याग्रह यात्रा दि. ९/६/२०२३ रोजी सेवाग्राम येथून सुरू करण्यात आलेली आहे. त्या सत्यगृहाला पाठिंबा म्हणून सिर्सी व परिसरातील इतर गावातील भजन मंडळांनी संत रंगनाथ बाबा देवस्थान येथे एकत्र होऊन आपला पाठिंबा दर्शविला. संत भिकराम फाउंडेशन शाखा सिर्सी च्या वतीने या सहयोग यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी संत भिकराम फाउंडेशन चे नागपूर जिल्हाध्यक्ष श्री. भोजराज ढोके यांनी या सहयोग यात्रेचे आयोजन केले होते. गावकऱ्यांनी व भजनी कलावंतांनी या सहयोग यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला आहे.