Friday, April 12, 2024
Homeनागपुरशाळेच्या क्रीडा साहित्यात कोब्रा नागाने मांडले होते ठान, सर्प मित्र आकाश लेंडेच्या...

शाळेच्या क्रीडा साहित्यात कोब्रा नागाने मांडले होते ठान, सर्प मित्र आकाश लेंडेच्या टीम ने सुखरूप केली सुटकाउमरेड

सकाळी ११.३०. वाजता सर्पमित्र कुणाल लांबट यांचा फोन सर्पमित्र रजत घुगुसकर यांना आला व सांगितले की त्यांच्या बाबाच्या शाळेत सिल्लेपार या गावी वर्गात साप आहे. आकाश, रजत व कुणाल तत्काळ जायला निघालो. साप हा उमरेड वरुण 12 km जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिल्लेपार, तालुका-भिवापूर या ठिकाणी होता. त्या ठिकाणी पोहचले असता साप हा एका वर्गात शालेय क्रीडा वस्तू ठेवलेल्या ठिकाणी गुंडाळी मारून होता. शाळा चालू झाली तर वर्गाची साप सफाई शिक्षक व विद्यार्थी करत होते. तसेच एका दुसऱ्या वर्गातील विद्यार्थिनीला साप दिसला लगेच तिनी शिक्षकांना कळविले व काही क्षण न घालवता मुख्याध्यापक श्री.पुंडलिकजी लांबट सरांनी त्यांच्या चिरंजीव कुनालच्या मदतीने कळविले, माहिती मिळताच सर्पमित्र 10/15 मि. शाळेत पोहचलो. तर निर्देशनास नाग महणजेच कोब्रा या विषारी जातीचा साप असल्याचे आढले साप हा लाकडी डंम्बल्स च्या खाली लपून बसला होता. आकाश आणि रजत ने त्या सापाला मोठा शिफारसीने पकडले व शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा मनात सापा बद्दल जी चुकीची माहिती होती ती दुर करण्याचा प्रयत्न केले शिक्षकाने आभार मानले व चांगले मार्गदर्शन केले म्हणून आकाश व रजत घुगुसकर याचे सत्कार केले
🐍 *नागाची माहिती व वैशिष्ट्य*-
*नागाच्या फण्यावर दोन का रंगाची वृतुळे किंवा कडी असतात आणि ती एकमेकांना काळ्या वक्राकार रेषेनी जोडलेली असतात. त्यामुळे ती दुरून १० च्या आकड्या सारखी दिसतात काही नागांमध्ये हा आकडा वेगळा असतो तर काही मध्ये नसतो, फण्याच्या आतल्या बाजूला दोन काळे ठिपके असतात, डिवचला असता फुत्कारा मारून शत्रूला धोक्याचा इशारा देतो. नागाला कान नसतात. त्यामुळे त्याला ऐकू येत नाही. गारुड्याने पुंगी वाजवली की नाग डोलतो, असे म्हणतात पण ते चूक आहे. पुंगी वाजविताना गारुडी पुंगी हलवतो,हात किंवा पुंगी वर खाली करतो या हालचाली कडे नाग टक लाहून पाहत असतो व त्याच्या हालचाली नुसार नाग मानेची हालचाल करतो. या वस्तू हलवल्या नाहीत तर नागही डोलत नाही*


*कृपया सापाला मारू नका साप दिसल्यास सर्पमित्रांना कळवा*
*निसर्गाला सापाची गरज आहे*

🐍 *सर्पमित्र* 🐍
*आकाश लेंडे -9921859233*
*जयेश भुसारी -8485864234*
*रजत घुगुसकर -8888185885*
यांनी कळविले आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular