कन्हान : स्थानीय वैष्णवी मंगल कार्यालय येथे दर वर्षी प्रमाणे नगरसेवक विनय यादव मित्र परिवारा तर्फे जागतिक महिलादिनाच्या औचित्य साधून महिला शसक्ती व सक्षमीकरण करण्या करता भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार डी.एम रेड्डी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून नगर परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ आशा सनोज पनिकर आणि समाज सेविका मनीषा पारधी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजोलीत करून भारत मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. मंचावर उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांनी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महिला स्वतंत्र सैनिक यांचा विचारांवर प्रकाश टाकत लकी ड्रॉ द्वारे निवडून आलेल्या महिलांना पैठणी देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी कल्पना चाहंदे, विशाखा ठमके मॅडम,डॉ. तेजस्वी गोतमरे, डॉ. आयुषी चौधरी,शालिनी बर्वे, अनिता पाटील,पूनम राठी,आदी महिला प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय पारधी, सनोज पनिकर, रिंकेश चवरे, चंद्रशेखर बोरकर,राहुल पाटील,आदीनी परिश्रम घेतले. आभार नगरसेवक विनय यादव यांनी मानले.