नागपूर जिल्हा प्रतिनिधी
सावनेर -1 सप्टेंबर 2023

नागपूर सावनेर मार्गावरील पाटनसावंगी जवळील वाकी येथे श्री बाबा ताजुद्दीन औलिया यांचा सहामाही उर्स दि.३ सप्टेंबर ला साजरा करण्यात येत आहे.
या उर्स मध्ये देशाच्या विविध भागातून असंख्य श्रद्धाळु बाबांच्या दर्शनाकरीता येतात यामध्ये साधुसंत व फकीरांचा समावेश असतो.
राष्ट्रीय एकता व अखंडता यांचे प्रतीक श्री.बाबा ताजुद्दीन औलिया यांनी आपल्या जीवनातील १२ वर्षाचा जीवनकाळ वाकी येथे घालविला.त्यांच्या चरण स्पर्शाने वाकी नगरी पावन झालेली आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ३ सप्टेंबर ला दुपारी २ वा. प.पु. काशिनाथजी नाना डाहाके पाटील यांच्या वाकी गावातील निवास स्थानातून (वाडा) संदल निघेल व तो वाकी गावाला गस्त करून सायंकाळी ६ वा. वाकी दरबार येथे पोहोचेल. त्यानंतर परंपरेनुसार सज्जादा नशिन श्री. ज्ञानेश्वरजी डाहाके पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन होईल यावेळी सावनेर विधानसभा क्षेत्राचे माजी मंत्री आमदार श्री. सुनीलबाबु केदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बाबांना चादर चढविण्यात येऊन उर्स ला प्रारंभ होईल. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. रात्री ८ वा. मिलाद व ९ वा.कव्वालीचा कार्यक्रम होईल. दि.४ सप्टेंबर ला सकाळी १० वा. कुल शरीफचा कार्यक्रम होऊन उर्स ची समाप्ती होईल.
या उर्स च्या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान श्री. बाबा ताजुद्दीन दरबार वाकी ट्रस्ट चे अध्यक्ष तथा सज्जादा नशीन श्री प्रभाकरजी डाहाके पाटील यांनी केले.