कुही-
मा बाळासाहेब ठाकरे ग्रामीण कृषी परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) जागतिक बँकेच्या साहाय्य अंतर्गत(vcdc) मिरची पिकावर शेतीशाळा व बियाणे वाटप कार्यक्रम दि15/06/23 रोजी सकाळी 11.00 वा मौजा वडेगाव येथे आयोजित करण्यात आला. या प्रकल्पा अंतर्गत मांढळ ऍग्रो प्रोडक्ट प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ची निवड करण्यात आली आहे.
मागील वर्षी पासून पीक प्रात्यक्षिक मिरची व त्यावर आधारित मुल्य साखळी विकास शेतीशाळा राबविण्यात येत आहे.मा श्री अरविंद उपरिकर प्रकल्प संचालक आत्मा नागपूर यांचे उपस्थित शेतीशाळेच्या पहिल्या वर्गाचे आयोजन करण्यात आले व तलवार या वाणाचे बियाणे वाटप करण्यात आले व शेतीशाळे मध्ये शेतकऱ्यांना रोपाची नर्सरी तयार करणे,सिडलिंग ट्रे मध्ये रोपे तयार करणे, लागवडीची सुधारित पद्धती मातीपरिक्षण ,बीजप्रक्रिया प्राथमिक अवस्थेत पिकावर येणाऱ्या कीड रोगाचे व्यवस्थापन इत्यादी बाबत माहिती देण्यात आली. तसेच स्मार्ट प्रकल्प व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या भविष्यातील वाटचाली बाबत व प्रक्रिया उद्योगा बाबत मा प्रकल्प संचालक आत्मा श्री अरविंद उपरिकर यांनी दिली .सविस्तर मार्गसदर्शन केले . मिरची पिकावर तांत्रिक मार्गदर्शन श्री वैभव मते कोरोमडल पेस्टीसाईड डेव्हलपमेंट आफिसर यांनी केले . श्री बी सी कोळी मंडळ कृषी अधिकारी यांनी कृषी विभागातील विविध योजनांची व खरीप हंगाम पूर्व नियोजनावर चर्चा केली कार्यक्रमाला कृ प श्री पहापले कृ स श्री रोडगे कंपनीचे संचालक श्री प्रसाद तिडके, वृशुकेतू भांबुलकर व उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन व संचालन श्री सचिन ताकसांडे यांनी केले या कार्यक्रमाला शेतीशाळेतील निवड केलेले 30 शेतकरी उपस्थित होते