गावातील जुगार व सट्टा प्रकरण
विदर्भ कल्याण / पुंडलीक कामडी
सिर्सी: काही दिवसापासून या गावातील लोकांच्या धुमधडाक्यात सुरू असलेली पत्त्यांचा जुगार व सट्टापट्टी याविषयी तक्रारी येणे सुरू होते. लोकांना व तरुण पिढीला या बरबाद करणाऱ्या छंदापासून मुक्त करण्यासाठी असे धंदे बंद व्हायला पाहिजे अशे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. लोकांच्या विनंतीवरून दै. विदर्भ कल्याण ने जुगाराची बातमी प्रकाशित केली होती. या बातमीच्या माध्यमातून लोकांनी यावर आळा घालावा अशी मागणी केली होती. त्यावर स्थानिक नेते, सामाजिक कार्यकर्ते व काही जागरूक नागरिक यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

” जुगाराविषयी आमचे कडे तक्रारी येणे सुरू आहे. याविषयी आमचे पोलीस प्रशासणासोबत बोलनेसुद्धा झालेले आहे. पण काही दिवसांपासून पोलीस चौकीमध्ये कर्मचारी वर्ग उपस्थित नव्हता त्यामुळे या काळात कित्येक कामात पोलिसांचे सहकार्य आम्हाला मिळाले नव्हते. तरुण पिढीला बरबाद करणारे असे उद्योग आम्ही आमच्या गावात मुळीच चालू देणार नाही. याविषयी अश्या धंद्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी याकरिता आम्ही वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत.”
श्री. विलास माकोडे
सरपंच, ग्रा.प. सिर्सी
” आम्ही अश्या प्रकारच्या अवैध धंद्यांचे प्रकरणं कित्येक वेळा उचलले आहेत. आम्ही जर त्यांचेकडे बंद करायला सांगायला गेलो तर ते लोक आम्हालाच धमक्या देतात. अश्या प्रकारच्या धंद्यावर कडक कारवाई व्हायलाच पाहिजे. “
श्री. अतुल नारनवरे
ग्रा.प.सदस्य