Saturday, May 25, 2024
Homeनागपुरराष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारे नागपुरात डाॅ.पंजाबराव देशमुख यांची १२२ वी जयंती उत्साहात...

राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारे नागपुरात डाॅ.पंजाबराव देशमुख यांची १२२ वी जयंती उत्साहात साजरी…

नागपूर, २७ : विदर्भात शिक्षणाची पाळेमुळे मजबूत करणारे व समस्त बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून विकास प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी आयुष्यभर झटणारे भारताचे पहिले कृषीमंत्री डाॅ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची १२२ वी जयंती रविवारी नागपुरात उत्साहात साजरी करण्यात आली.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डाॅ. बबनराव तायवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवारला महाराजबाग चौक स्थित डाॅ.पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, मंत्री सुनील केदार, काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे, बहुजन विचार मंचचे अध्यक्ष नरेंद्र जिचकार, उपमहापौर मनीषा कोठे, माजी आमदार दिनानाथ पडोळे, मनपा विरोधीपक्ष नेते तानाजी वनवे, आ.परिणय फुके, माजी आमदार अशोक धवड यांच्यासह अनेक बहुजन समाजातील नेते व कार्यकर्ते प्रचंड संख्येंनी उपस्थित होते.

प्रारंभी ओबीसी नेते डाॅ.बबनराव तायवाडे यांनी डाॅ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी जय ओबीसी व डाॅ. पंजाबराव देशमुख अमर रहे या घोषणांनी परिसर दणाणून गेला. घोषणा सुरू असतांनाच मंत्री सुनील केदार यांचे आगमन झाले. काही वेळातच पालकमंत्री डाॅ.नितीन राऊत आल्यानंतर उपस्थित लोकांमध्ये उत्साह संचारला. दोन्ही मंत्र्यांनी माल्यार्पण करून डाॅ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. महाराज बाग चौकातील पीकेव्ही परिसरात ओबीसींसह बहुजन लोकांची प्रंचड उपस्थिती होती.

यावेळी संघटनेचे पदाधिकारी प्रा.शरद वानखेडे, गुणेश्वर आरीकर, शकील पटेल, प्रा. संजय पन्नासे, प्राचार्या डाॅ. शरयू तायवाडे, नंदा देशमुख, अवंतिका लेकुरवाळे, विजया धोटे, लिना कटारे, सुनीता येरणे, लक्ष्मीताई बर्वे, डॉ. रंजना गोसावी, विनोद उलीपवार, डॉ. राजू गोसावी, परमेश्वर राऊत, रोशन कुंभलकर, विनोद हजारे, गणेश नाखले, विकास गौर, राजु मोहोड, ईश्वर ढोले, संजय मांगे, राजु बोचरे, डाॅ.चांदेकर, किशोर जिचकार, रवींद्र दरेकर, बाबा वकील, कमलेश समर्थ, अशोक यावले, पुरुषोत्तम शहाणे, रमेश चोपडे, मुकुल बुरघाटे यांच्यासह शेकडो बहुजन भगिनी आणि बांधव उपस्थित होते.
आपला नम्र

रोशन कुंभलकर
(प्रसिद्धी प्रमुख)
राष्ट्रीय ओबीसी महासंघ
Mob: 8421008900

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular