पिपरा प्रतिनिधी
आशिष सोनटक्के
नागपूर जिल्ह्यात संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेला येथे आज दिनांक 16 सप्टेंबर ला संत बालयोगी रामचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथीने बेला आणि परिसर भक्तिमय होऊन गेला.
नगाजी महाराज, रामचंद्र महाराज, केजाजी महाराज, कोलबा स्वामी महाराज, इस्तरी महाराज, अशा अनेक संतांनी बेलाच्या भूमीत जन्म घेतला असून यात संत बालयोगी रामचंद्र महाराजांची आज पुण्यतिथी वेणा नदीच्या तीरावर कडजना तीर्थक्षेत्र येथे महाराजांचे वास्तव्य होते 1988 साली मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्यात मोठ्या भक्तसंख्या असलेल्या महाराजांच्या समाधीचे आजही विदर्भातून भक्तगण दर्शन करण्याकरिता येतात आज पुण्यतिथी असल्यामुळे कडजना येथून महाराजांची पालखी मोठ्या दिमाखात बेला येथे मुख्य रस्त्यावरून भ्रमण करून कोरोणा चे नियम पाळत निघाली भजन आणि हरिनामाचा गजर करत पालखी पुढे सरकत होती बेलायातील रस्ते फुलांनी व रांगोळ्यांनी सजले होते घरासमोरील रस्त्यावरून जाणाऱ्या पालखीचे स्त्रियांनी पूजन केले व दर्शन घेतले बेला येथील रामचंद्र महाराजांच्या मठात पालखीचे आगमन झाले महाआरती करून पालखीची सांगता करण्यात आली पालखीसोहळ्याला यशस्वी करण्याकरिता कडजना पंचकमिटी यांनी मोलाची भूमिका बजावली आणि पोलिसांनी सुद्धा सहकार्य केले