गडचांदुर – मो.रफिक शेख -भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि भारताचे माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त महात्मा गांधी विध्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे हे होते तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य विजय आकनुरवार,पर्यवेक्षक अनिल काकडे,हनुमान मस्की,सौ शोभा जीवतोडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन प्रा प्रदीप परसुटकर यांनी तर आभारप्रदर्शन प्रा संगिता पुरी यांनी केले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यप्रसंगी उपस्थित होते