कळमेश्वर -०२फरवरी2022
कळमेश्वर गोंडखैरी रोडवर सेलू गावाजवळ अज्ञात वाहनाने वांनर माय लेकाला वन प्राण्याला गाडीने धडक दिली त्यात त्याला खूप मार लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला.मृत्यू झाल्यानंतर सुद्धा बराच वेळ झाल्यावर त्याची माहिती गोंडखैरी नागपुर येथील बळीराजा फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांना मिळाली.ताबडतोब क्षणाचा विलंब न करता बळीराजा फाउंडेशनची रुग्णवाहिका व कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले.

सर्वात प्रथम वन अधिकारी यांच्याशी संपर्क करण्यात आला.वनरक्षक प्रशिक पाटील हे घटनास्थळी दाखल झाले व मृत वानर व तिचा छोटपिल्लू यांचा पंचनामा करण्यात आला व मुक्या जीवाची सुद्धा मनुष्या सारखीच अंत्यविधी पार पडली.तेथून जवळ असलेले जंगलात त्यांच्यावर अंतविधी म्हणून माय लेकाला माती देण्यात आली.या कार्यात सहभागी राहुल अतकरी,निखिल मोरे,मयूर अतकरी,रियाज शाह,रजनीकांत अतकरी व अनेक शेतकरी उपस्थित होते.