Tuesday, July 16, 2024
Homeनागपुरनिराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान तात्काळ द्या हो !

निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान तात्काळ द्या हो !

बल्लारपुर (चंद्रपूर)◽

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान गेल्या जून महिन्यापासून थकीत पडलेले आहे ते अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले नाही गोरगरीब, वृद्ध, अपंग,या अनुदानाची आतुरतेने वाट बघत आहे.निराधारांचे देय असलेले अनुदान तात्काळ देण्यात यावे अशी मागणी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष समीर केने यांच्या नेतृत्वात सर्व समिती सदस्यांनी नुकतीच केलेली आहे.


सदरहु अनुदान हे एकूणच महाराष्ट्रातील लाभार्थ्यांचे थकीत असल्याची माहिती आहे असे या समितीने निवेदनात म्हटले आहे अशातच राज्यातील लक्षावधी लाभार्थ्यांना अद्यापही अनुदानाचा लाभ मिळाला नसल्याने या सर्व लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे यावर शासनाने गंभीरतेने लक्ष घालून तात्काळ देय असलेली रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी अशी मागणी एका लेखी निवेदनातून करण्यात आली आहे . याप्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांना लाभार्थ्यांना अनुदान न मिळाल्याची माहिती देण्यात आली.सदरहु विषयाची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी संबंधित खात्याच्या मंत्रालयात सूचना केल्या असून उपरोक्त प्रलंबित अनुदान तातडीने लाभार्थ्यांना मिळेल याबाबत आश्वस्त केले आहे. संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने बल्हारपूरच्या तहसीलदार डॉ. कांचन जगताप यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपचे महामंत्री मनीष पांडे संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य राजेश दासरवार किशोर मोहुरले मल्लेश कोडारी सतीश कनकम श्रीनिवास कंदकुरी उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular