उमरेड प्रतिनिधी
*नेपाळ* ला झालेल्या *इंडो नेपाल इन्विटेशनल इंटरनॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप* मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करून *८ सुवर्ण पदके* जिंकून देशाचे नाव उज्वल करणाऱ्या उमरेड स्केटिंग अकॅडमी च्या ८ स्केटर्स च्या ह्या भरघोस व दैदिप्यमान यशाची नोंद घेत *प्रभाग क्रमांक १२ चे नगर सेवक व नगर परिषद उमरेड चे माजी बांधकाम सभापती श्री सतीश जी चौधरी* यांनी ह्या सर्व ८ स्केटर्स चा व शिमला येथील राष्ट्रीय स्केटिंग सहभागी झालेल्या एका स्केटर चा विशेष भेट वस्तू देवून सत्कार केला.
*अड्याळ वाले ले आऊट येथील मैदानावर नियमित सराव करणाऱ्या ह्या सर्व *९ स्केटर्स* व त्यांचे *प्रशिक्षक रविंद्र रामभाऊ मिसाळ* ह्यांनी उमरेड नगरीचे नाव जागतिक पातळीवर उंचावलेले आहे ही बाब समस्त उमरेड साठी गौरवास्पद आहे तसेच माझ्या प्रभागातील क्रीडा सुविधांनी सज्ज मैदानावरील हे यश आहे ह्याचा आम्हा सर्वांना विशेष आनंद आहे असे मनोगत ह्या प्रसंगी *नगर सेवक श्री सतीशजी चौधरी* ह्यांनी व्यक्त केले.
भविष्यातही प्रभागातील बालक, युवा व लोकांना उत्तमोत्तम क्रीडा सुविधा देण्याचा मानस श्री सतीश जी चौधरी ह्यांनी व्यक्त केला.
सृष्टि शिवाजी लुटे, मयंक नितेश बोदेले, रुचिका कमलाकर कोहाळ, अविष आकाश शेगये, महेंद्र सेशु बालम, यामिनी अमित गुप्ता, कृतीका हर्षल चाचरकर, दर्श प्रकाश कुंभारे व आरूष पंकज भोगे ह्या स्केटर्स चा सत्कार भेटवस्तू देवून व सोबतच उमरेड स्केटिंग अकॅडमी चे हेड कोच रविंद्र मिसाळ ह्यांचा शाल व श्रीफळ देऊन नगरसेवक श्री सतीशजी चौधरी यांनी व अन्य अतिथिंनी सत्कार केला.
ह्या प्रसंगी *श्री पंकज गायधने* (माजी उप सरपंच वायगाव घोटुरली), *प्रा. डॉ. निलेश बोडणे* (क्रिकेट प्रशिक्षक व प्राचार्य vit कॉलेज), *श्री विशाल सावरकर, श्री. भूपेश पाठराबे, श्री प्रकाश कुंभारे, श्री महेन्द्र भोयर, श्री संदीप सोनटक्के* व उमरेड स्केटिंग अकॅडमी चे पालक व सर्व स्केटर्स उपस्थित होते.