————————————— विदर्भ कल्याण नरखेड तालुका प्रतिनिधी ता. 8 नोव्हेंबर.
हनुमान नगर मित्र मंडळ नागपूर च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कोविड नियमाचे पालन करून दिवाळी निमित्ताने भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य मन्नू जसुतकर यांच्या प्रमुख उपस्थित व मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. ही रांगोळी स्पर्धा हनुमान नगर येथे दिवाळीच्या शुभ पर्वावर नुकतीच घेण्यात आली. प्रथम पारितोषिक तीन हजार एक, दुतीय पारितोषिक दोन हजार एक तर तृतीय पारितोषिक एक हजार एक रोख असे अनुक्रमे पारितोषिक पुरस्कार पुरुस्कृत करण्यात आले असून चार पुरस्कार 501 व उत्तेजनार्थ सर्टिफिकेट देण्यात आले रांगोळी स्पर्धेद्वारे नागरिकामध्ये ऊत्सव व सकारत्मक भूमिका निर्माण व्हावी या उद्देशांने हे मंडळ सामाजिक कार्य करीत असते.
या रांगोळी स्पर्धेमध्ये सौ प्रीती गिरहे, लीना गिरहे, विधी टेंटे, विना गायकवाड, शिल्पा भुरे, रश्मी खुणे, भैरवी वडस्कर, भागेश्री मेंढेकर, श्रुतिका उरकुडे,अनिकेत कातुरे, संदीप मेंढेकर, अंकित सहारे, प्रफुल वडस्कर, प्रशांत भोगोडे,अनुप आथिलकर, अभिजित नाईलवाड, लोकेश उरकुडे, प्रसाद बावनकर, अतुल वडस्कर, देवराव सहारे,आदी महिला व नागरिकांनी सहभाग नोंदवून रांगोळी स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित राहून हनुमाननगर मित्र मंडळ यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले.