जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी घटनास्थळी भेट देत केली पाहणी
ब्रम्हपुरी :- 3 एकरातील धानाचे पुंजणे अज्ञात इसमाने आग लावून जाळले असल्याची घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील गोगाव शेतशिवारात 12 नोव्हेंबर रोजी रात्री 7 वाजताच्या सुमारास घडली आहे.
गोगाव येथील रहिवासी असलेले प्रकाश रामचंद्र भोयर यांचे गावालगतच सायगाव रस्त्यावर शेती आहे. व त्यापासून काही अंतरावर दुसरे शेत आहे.

खरीप हंगामातील धानपीक कापणी करून त्याचे पुंजणे त्यांनी आपल्या शेतात करून ठेवले होते. तेव्हा विकृत मानसिकतेच्या अज्ञात इसमाने पुंजण्यांनी लवकर पेट घेतला पाहिजे म्हणुन त्यावर तणीस टाकुन आग लावली. एकाच इसमाच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या शेतातील धान्याच्या पुंजण्याला आग लावणे हे वैयक्तिक आकसापोटी केलेले कृत्य आहे असे दिसून येत आहे.त्यामुळे सदर इसमाचा पोलीसांनी शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी घटनास्थळी भेट देवून केली पाहणी
सदर घटनेची माहिती होताच जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी घटनास्थळी भेट देत धानाच्या जळालेल्या पुंजण्यांची पाहणी केली. व आपण जिल्हा परिषदेच्या योजनेतंर्गत सदर शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले.
सोबतच शासनाच्या विविध योजनांतुन सुध्दा मदत मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले. यावेळी त्यांच्या समवेत माजी सरपंच ईश्वर ठाकरे, माजी सरपंच तुळशीराम वाकडे, लोमेश कोसे, आनंदराव सेलोकर, दाजीबा सेलोकर, भास्कर गायकवाड, दशरथ वाकडे, मिनराज भोयर, चंद्रभान मांडवकर, संजय गाढवे हे उपस्थित होते.