१८ व १९ डिसेंबरला विविध कबड्डी संघ नोंदविणार सहभाग
खापरखेडा-प्रतिनिधी
जय दुर्गा मंडळ व न्यु आझाद क्रिडा मंडळ तामसवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गणपतराव लखडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिनांक १८ व १९ डिसेंबरला विविध गटात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे पुरुषवर्ग खुल्या गटात प्रथम ३१/- हजार रुपये रोख तर द्वितीय २५/- हजार रुपये रोख देणार येणार आहे.

तर ६५ किलो वजन गटात अनुक्रमे प्रथम ३०/-हजार रुपये द्वितीय २०/- हजार रुपये तृतीय १०/-रोख पारितोषिक देण्यात येणार आहे शिवाय स्पर्धे दरम्यान उत्कृष्ट खेळाडूंना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे.
कबड्डी स्पर्धेचे उदघाटन दिनांक १८ डिसेंबर शनिवारला दुपारी २ वाजता आमदार आशिष जैस्वाल यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खासदार कृपाल तुमाने राहणार आहेत यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्य कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किशोर गजभिये, भाजपचे शहराध्यक्ष प्रविण दटके आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
१९ डिसेंबर रविवारला बक्षिस वितरणाचा कार्यक्रम तहसीलदार प्रशांत सांगळे व पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या हस्ते होणार आहे यावेळी तामसवाडी ग्रामपंचायतचे सरपंच संदीप गजभिये उपसरपंच विलास काकडे व ग्रामपंचायत सदस्य प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
कबड्डी स्पर्धेचे औचित्य साधून १८ डिसेंबरला नवरंग ग्रुप कोल्हापूर यांच्या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कबड्डी स्पर्धेत मोठया संख्येने सहभागी होण्याचे आव्हाण मुख्य आयोजक चिंधू दुगाने, राजेश गोमकाळे, विलास गुजरमाळे, निलेश गोमकाळे यांनी केले आहे.