प्रवीण मस्के
मांढळ ( प्रतिनिधी ):
सेक्रेड हार्ट स्कूल करंभाड ता. पारशिवणी येथे दि. १ ते ३ फेबुवारी दरम्यान पार पडलेल्या जिल्हा क्रीडा स्पर्धेत कुही तालुक्यातील रूयाड( बां) येथील जि . प.प्रा.शाळाने घवघवीत यश प्राप्त करून क्रीडा प्रकारात अव्वल ठरली.
वरिष्ठ गट खो-खो मुले व वरिष्ठ गट लंगडी मुली या दोन्ही क्रीडा प्रकारात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रूयाड येथील शाळेने क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करीत अव्वल स्थान पटकाविले. सांघिक खेळ प्रकारात दोन खेळात विजेता ठरणारी नागपूर जिल्ह्यात एकमेव रूयाड शाळा ठरली आहे. तालुक्यातील
मागील अनेक वर्षांपासून या शाळेने खो-खो या क्रीडा प्रकारात विजेतपद मिळविण्याची परंपरा कायम केलेली आहे.
विशेष बाब म्हणजे या क्रीडा स्पर्धेच्या कालवधीत विद्यार्थी मुक्कामी असल्याने जि.प. उच्च प्राथमिक शाळा रूयाड शाळेतील कर्तबगार शिक्षक भाऊराव जिभकाटे व त्यांच्या विद्यार्थ्यानी स्वयंस्फुर्तीने परिसर स्वच्छता कार्यक्रम घेऊन परीसर प्लास्टिक मुक्त करून स्वयंशिस्त व स्वावलंबन याचा परिचय दिला.या आदर्श बाबीची विशेष दखल घेत जि.प. उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक भाऊराव जिभकाटे यांचा विद्यार्थ्यासह शिक्षणाधिकारी श्रीमती रोहीनी कुंभार यांनी गौरव केला.
तसेच कनिष्ठ गट खो खो मुले चिकना शाळा विजेता ठरली, १०० मी दौड स्पर्धेत राजोला येथील शाळेची विद्यार्थीनी जानवी वैद्य प्रथम आली.
सांस्कृतिक कार्यक्रमात कुही तालुका चॅम्पियन ठरला असून वरीष्ठ गट लोकनृत्य राजोला शाळा विजेता ठरली. व कनिष्ठ लोकनृत्य प्रकारात गोठणगाव शाळा उपविजेता ठरली, तसेच वेशभूषा या प्रकारात हरदोली नाईक शाळेची आदिती बारई यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत यश मिळविण्यासाठी क्रीडा शिक्षक भाऊराव जिभकाटे, अनिल हुमणे, या शाळेचा माजी विद्यार्थी सुरज कामठे, संजय सिंदुरकर यांनी विशेष परीश्रम घेतले.
रुयाड येथील गावकर्यांनी खेळांडूची वाजत गाजत मिरवणूक काढून खेळाडूंचे जंगी स्वागत करून विजयोत्सव साजरा केला.
सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी श्रीमती शारदा किनारकर, विस्तार अधिकारी श्री अशोक बांते, गणेश लुटे , केंद्रप्रमुख महेन्द्र दापूरकर , मुख्याध्यापक पुरुषोतम कावटे गावचे सरपंच विजय गोरबडे, उपसरपंच गणेश मोहतुरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लोकेश बांडेबुचे यांनी अभिनंदन केले.या प्रसंगी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते, त्यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन केले.