भिवापूर तालुक्यात महिला बचत गटाचे उत्कृष्ट कार्य
भिवापूर : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व उमरेड नगरपरिषदेच्या वतीने पार पडलेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात भिवापूर तालुक्यात महिला बचत गटाचे उत्कृष्ट कार्य करीत असल्याबाबत आरती मुकुंदराव नागपुरे (तिमांडे) यांचा सत्कार करण्यात आला. हा सोहळा उमरेड येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय नाट्यगृहात पार पडला.

ग्रामीण भागात महिलांच्या संस्था तयार करणे, महिला सक्षमीकरण, गावस्तरावर महिलांना उपजीविका निर्माण करण्याकरिता मदत करणे, विविध शासकीय योजनांची माहिती ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहचवून योजनेचा लाभ, महिलाना मिळऊन देणे असून भिवापूर तालुक्यात ग्रामीण भागात 1149 महिला बचत गट, 71 ग्रामसंघ, 2 प्रभाग संघ, 23 महिला शेतकरी उत्पादक गट, भिवापूर महिला शक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी, बचत गटाचे मदर डेअरी दूध शीतकरण केंद्र स्थापन करण्यात आले, व पुढील कार्य सुरू असल्याबाबत सत्कार करण्यात आला.
यावेळी उमरेड, भिवापूर, कुही तालुक्यातील विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५१ महिलांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खा. कृपाल तुमाणे, आ. राजू पारवे, माजी आ. सुधीर पारवे, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, संजय मेश्राम, गंगाधर रेवतकर, नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश खवले, पुष्कर डांगरे, जगदीश वैद्य उपस्थित होते.