आमदार राजू पारवे यांना शेतक-यांचे नीवेदन
कुही- कृषी पंपाची विज चार दिवस सकाळी ७ते३ व तीन दिवस रात्री ९ते५ दिली जाते ते बंद करुन पुर्वीसारखी च सातही दिवस दिवसभर विज द्यावी या मागणीचे नीवेदन घेऊन कुही तालुक्यातील शेतकरी आज आमदार राजु पारवे यांचे नीवासस्थानी धडकले.
शेतक-यांनी नीवेदनात म्हटले की,रात्रीची विज दिल्यामुळे शेतक-यांना रात्री काडी कच-यात सींचनासाठी जीव धोक्यात टाकुन जावे लागते याच आठवड्यात मांढळ येथील कळंबे या शेतक-यावर सींचनासाठी जाताना रात्री रानडुकरांनी प्रानघातक हल्ला केला अशाप्रकारे जिवहानी होऊ नये म्हणुन पुर्वीप्रमाणेच कृषीपंपाचा विजपुरवठा कायम ठेवावा अशी मागणी शेतक-यांनी नीवेदनात केली.
नीवेदन देताना लीलाधर धनविजय,वसंता ठवरे,नाना ठाकरे,संजय मुटकुरे,शंकर नीरगुळकर,सुभाष फोफसे, शंकर मेश्राम,मनोहर दिघोरे,मनोहर नीरगुळकर, सुनील कोंडेवार,राजेराम कळंबे,यशवंत नवघरे,तीतरमारे, सुरेश कुकडे,तुळशीराम कळंबे, गोपाल दिघोरे उपस्थित होते.