ठिकठिकाणी पालखी पदयात्रेचे फुलाच्या वर्षाने जल्लोषात स्वागत
श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान व्दारे आयोजन
कन्हान : – श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान व्दारे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा रामनवमी उत्सवा निमित्य कन्हान ते शिर्डी पालखी व पदयात्रेचे आयोजन करण्यात आले . काल बुधवार (दि.२७) मार्च ला सकाळी ११ वाजता श्री साई मंदीर इंदिरा नगर , कन्हान येथे सर्व साई भक्तांनी विधिवत पुजा अर्चना , महाआरती आणि परिसरात प्रसाद वाटप करुन भव्य मिरवणुक काढण्यात आली . ही पालखी पदयात्रा परिसरातील विविध मार्गाने भ्रमण करुन तारसा रोड मार्गाने नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वर आली असता आंंबेडकर चौक , गांधी चौक येथे साई भक्तांनी पालखी पदयात्रेचे फुलाच्या वर्षाने , फळ , पानी बोटल , शरबत वितरण करुन जोरदार स्वागत केले . शैकडो साई भक्तांनी पालखी पदयात्रेत सहभाग घेतला . भाविकांनी साई मंदीर आडापुल,कामठी येथे साई चे दर्शन घेऊन साई पालखी पदयात्रा कामठी नागपुर मार्गाने शिर्डी करिता रवाना झाली .