
एस.टी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एस.टी कर्मचाऱ्यांना राज्यशासकीय कर्मचारी व अधिकाऱ्याप्रमाणे सेवाजेष्ठता निश्चित करून एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एस.टी. कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपला संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष शिवश्री पवन लांबट मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड मार्फत जाहीर समर्थन देण्यात आले.उपविभागीय अधिकारी सावनेर तहसील कार्यालय सावनेर व आगर प्रमुख एस.टी महामंडळ सावनेर तालुका अध्यक्ष पवन लांबट यांचा नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.त्यावेळी पवन लांबट अध्यक्ष संभाजी ब्रिगेड सावनेर तालुका, भगवान चांदेकर अध्यक्ष जनकल्याण बहु.सामाजिक संघटना महाराष्ट्र, मराठा सेवा संघ माजी अध्यक्ष विक्रम गमे, मोहन निकाजू,महादेव बलकी,जगदीश जोहर,छत्रपाल निकोसे,सुरेश कोळमकर,दत्ततय खरे,दशरथ साळवे,किशोर कोल्हे, हर्षल लांबट,रामू कोलते, तसेच संपूर्ण एस.टी. कर्मचारी उपस्थित होते .