उमरेड स्केटिंग अकॅडमी चा 77 स्केटर्स चा सहभाग.
उमरेड स्केटिंग अकॅडमी द्वारा आयोजित ग्रीष्मकालीन स्केटिंग शिबिरात स्केटिंग स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

उमरेड स्केटिंग अकॅडमी च्या ह्या स्केटिंग स्पर्धेत 77 स्केटर्स नी सहभाग घेत आपल्या स्केटिंग प्रतिभेचे उत्तम प्रदर्शन करीत मेडल्स जिंकलेत.
4 वर्ष वयोगटापासून 14 वर्षावरील एकूण 7 वयोगटात आणि बिगीनर, क्वाड व इनलाईन ह्या 3 श्रेणीमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धा पुरस्कार वितरण समारंभा प्रसंगी उमरेड नगर परिषद प्रभाग 12 च्या माजी नगरसेविका व रेणुका कॉन्व्हेन्ट च्या संचालिका रेणुका कामडी, आतंरराष्ट्रीय धावपटू श्री चाफलेजी, उमरेड चे तज्ञ होमिओपॅथी डॉक्टर डॉ महेश लटे व भारतीय आर्मी सेवानिवृत्त कॅप्टन श्री ज्ञानेश्वर उपस्थित होते.
ह्या स्केटिंग स्पर्धेत मे गोल्ड मेडल्स जिंकणारे स्केटर्स –
प्रभास मिसाळ, रुचि मिसाळ, निशिका तवले, दुर्वांग राघोरते, साक्ष हजारे, क्रिष्टी लिंगायत, सहर्ष अनकर, विवेक बेले, शास्वत नरुले, कुंज बालगोटे, दिशांत बोकडे, हितांश पिसे, कौष्यप्पी बोर्डेकर, स्वराली मेहतकर, अन्वय लुटे, प्रत्युष सेलोकर, वेदांती झाडे, आरूष चकोले, सिमरन ठाकरे, स्वानंदी घरत, एंजेल लिंगायत, हर्ष झाडे, सृष्टी ठुसे, अविष शेगये, तेजस्वी चींचपाले, जनक पाठक, अंशिता तांबेकर, सुजल कोसे.
सिल्व्हर मेडल्स जिंकणारे स्केटर्स –
प्रलक्ष राघोरते, अद्विक लुटे, स्वदिप विरुळकर, त्रिषा शिलेदार, ईशान पांडे, अथर्व धामनगे, प्रज्ञांश देठे, हर्षित गाठे, गाझी पठाण, मोहन दलाल, भार्गवी गेडाम, त्रिशा चकोले, आरव खडसे, विहान चव्हाण, जिविका नेवारे, रिद्धेश दलाल, स्वरा लटे, निराली वाघमारे, तन्वी बोकडे, कुणाल सावरकर, रेशव चौधरी, अर्पित लाडेकर.
ब्राँझ मेडल्स जिंकणारे स्केटर्स –
जयेश हिरडकर, स्वचेत सहारकर, दिशा बचाले, प्रिन्स जोधे, रोहित काकडे, कैवल्य सिनकर, ध्रुवी जिभकाटे, समयांक बोबडे, काव्या शिलेदार, अर्दील पठाण, रुद्र हजारे, छायांक गायकवाड.
स्पर्धेच्या यशासाठी विभा मिसाळ, रेहान रजा शेख, ओम बोरकर, परिकेत भगत यांनी परिश्रम घेतले.
सर्व स्केटर्स उमरेड स्केटिंग अकॅडमी चे नियमित खेळाडू असून आपल्या यशाचे श्रेय आपले पालक व स्केटिंग कोच रविंद्र मिसाळ ह्यांना देतात.
सभी विजयी स्केटर्स चे उमरेड वासियांद्वारा अभिनंदन केल्या जात आहे.