या वर्षीचा सोयाबीन खरेदी-विक्री हंगाम सुरू झाला असुन उमरेड बाजार समितीचे मुख्य मार्केट यार्डमधे २३/९/२१ गुरुवारला बाजार समिती सभापती रुपचंद कडु यांचे हस्ते सोयाबीन ढेरी व काटापुजन करण्यात आले. नवीन सोयाबीन विक्रीला आणलेल्या शेतकऱ्यांना दुपट्टा टोपी व पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले व लिल्लाव सुरू झाला. शंभर क्विंटल नवीन सोयाबीन विक्रीला आले होते, प्रतिक्विंटल ३४०० ते ६००१ रुपये भाव मिळाला.
सोयाबीन खरेदी-विक्री शुभारंभ प्रसंगी म. रा. बाजार समिती संघाचे उपाध्यक्ष विजय खवास, समितीचे संचालक शिवदास कुकडकर, विकास देशमुख, दत्तु फटींग, रतन लहाने, माजी संचालक हिरामण नागपूरे, सामाजिक कार्यकर्ता मधूकर देरकर, शेतकरी हरिश्चंद्र श्रीखंडे, गौरव उमाटे, पिंटू गजघाटे, गोविंदा मस्के, उमाजी वंजारी, प्रविण डावखरे, वामन चिमुरकर, किशोर सुपारे, क्रिष्णा बालपांडे, सुखदेव पाटील, चेतन नयनानी, समितीचे बाजार निरीक्षक गणेश सोनडवले, लिपीक सतिश कुबडे, विलास श्रीखंडे, चकोले, अडते, व्यापारी, इत्यादी उपस्थित होते.