यांचा जाहीर सत्कार
कळमेश्वर तालुका प्रतिनिधी

कळमेश्वर तालुक्यातील उबाळी या गावातील कु उज्वला भीमराव बागडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जनकल्याण सामाजिक बहुउद्देशीय संघटनेचया तर्फे सन्मानपत्र देऊन नुकताच सत्कार करण्यात आला होता यावेळी त्यांचे वडील भीमराव बागडे यांची आर्थिक परिस्थिती बेताची असताना मुलीला सातव्या वर्गापर्यंत जिल्हा परिषद शाळा येथे प्राथमिक प्राथमिक शिक्षण तिचे पूर्ण केले नंतर पुढील ग्रॅज्युएशन कळमेश्वर ला पूर्ण करून नंतर मुलीची इच्छा शासकीय प्रशासन सेवेमध्ये असल्याने एमपीएससी परीक्षेकरिता टेनिस करिअर अकॅडमी कोराडी येथे तिचे क्लास लावण्यात आले महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा 2018 उत्तीर्ण झाल्याबद्दल उबाळी गावासह संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
कु उज्वला बागडे यांनी आपल्या मनोगतुन व्यक्त केले की ध्येय चिकाटी आत्मविश्वास निश्चित असेल तर यशस्वी होण्याकरिता आपल्याला कोणीच रोखू शकत नाही मला यशस्वी होण्यामागे माझी आई वडील शालेय शिक्षक यांचे फार मोठे योगदान आहे अशा प्रकारचे मत तिने व्यक्त केले एका छोट्याशा खेडेगावातून तिने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल संपूर्ण नागपूर जिल्ह्यातून शुभेच्छा व अभिनंदननाचा वर्षाव तिच्यावर होत आहे
याप्रसंगी सत्कार करताना जनकल्याण सामाजिक बहुउद्देशीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान चांदेकर संघटनेचे विदर्भ प्रभारी महेंद्र सातपुते पत्रकार युवराज मेश्राम शेतकरी संघटनेचे संजय चौधरी मयूर नांदवणे दादाराव लांजेवार ऋषी धर मरस कोल्हे भीमराव बागडे सुनील खंडाळकर जिवन बागडे आदींनी सन्मानपत्र देऊन सत्कार करून अभिनंदन केले