कुही विदर्भ कल्याण

कुही तालुक्यातील कळम शिवारात बैल जोडी मोटर पंपाच्या इलेक्ट्रिक वायर तुटल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडल्याचे समजते. शेतकरी शंकर लुटे हे आपली बैल जोडी आणि वखर लोखंडी खासरावर मांडून शेतात जात असताना वामनजी छोटे यांच्या शेतातील विहिरीवरील इलेक्ट्रिक करंट वायार जमिनीवर पडले असल्यामुळे बैलजोडीचे जागीच मृत्यू झाले आणि शेतकरी मात्र थोडक्यात बचावल्याची माहिती मिळाली आहे विद्युत वितरण कंपनी ही ग्राहकांना वीज देत असताना त्या विजेवरील देखरेख बरोबर करीत नसल्यामुळे हे प्रसंग शेतकऱ्यांवरती येत आहे. या शेत मालकाचे कमीत कमी दोन लाख रुपयाची नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहे. तेव्हा वीज वितरण कंपनी त्या शेतकऱ्याला म्हणून दोन लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी करत आहे.