राजुरा प्रतिनिधी :
पाचगाव येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देत नसल्यामुळे वेळप्रसंगी रुग्णाची मोठी गैरसोय होत असल्याबाबतची तक्रार गावकऱ्यांनी थेट जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे

राजुरा मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पाचगाव येथे आरोग्य वर्धिनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे मात्र, येथे डॉक्टर व आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे सदर आरोग्य वर्धिनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये पाचगाव,मडावीगुडा, कोडपेगुडा,कैकाडी गुडा,सीडामगुडा,कुडमथेगुडा,कोटकागुडा,
पारधीगुडडा,गोलकरगुडा,आदी पड्यासह अहेरी, कोची,साखरवाही,राणवेली, या गावांचा समावेश आहे
सध्या पावसाळ्याचे दिवस असून सतत होत असलेल्या वातावरणाच्या बदलामुळे आजाराचे प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे रुग्ण उपचार घेण्यासाठी येथील उपकेंद्रात येतो मात्र, येथे नियुक्त करण्यात आलेले डॉक्टर व आरोग्य सेविका उपस्थित राहत नसल्यामुळे नाईलाजास्तव रुग्णांना राजुरा येथील खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार करावा लागत आहे
आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी येणारे सर्व रुग्ण मजूर,गोरगरीब कुटुंबातील आहेत त्यामुळे त्यांना खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार करणे कठीण झाले आहे या केंद्रामध्ये कोणीही उपस्थित राहत नसल्याने सध्या ह्या आरोग्य उपकेंद्रात गुरांचा संचार वाढला असून कुरणक्षेत्र बनले की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
मुख्यालयी राहून सेवा देत नसलेल्या डॉक्टर तसेच आरोग्य सेविका यांचेवर योग्य ती कारवाई करून मुख्यालयी राहण्याबाब आदेशीत करावे अशा आशयाची तक्रार सरपंच नामदेव आळे, लक्ष्मण गेडाम,सचिन वाकुलकर,दीपक भेंडे,अनिता चहारे, दादाजी मडावी,गजानन भेंडे,अक्षय बावणे,कमलाकर इंदूरवार,विकास वाघाडे,मंदा सुरपाम, महेश लाड,शशिकला नूलावर,प्रकाश कोहपरे,आदींसह अनेकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली असून तक्रारीची प्रत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिली आहे