Saturday, July 27, 2024
Homeनागपुरआमदार सुधीर पारवे यांनी शेतकऱ्यांसाठी वाढीव मोबदला देण्यासाठी घेतली तहसील मध्ये बैठक

आमदार सुधीर पारवे यांनी शेतकऱ्यांसाठी वाढीव मोबदला देण्यासाठी घेतली तहसील मध्ये बैठक

उमरेड प्रतिनिधी

मा. श्री सुधीरजी पारवे, माजी आमदार उमरेड विधानसभा क्षेत्र यांच्या प्रमुख उपस्थितीत मौजा मकरधोकडा, बोपेश्वर, दहेगाव-


कटारा आणि हेवती या गावातील वेकोली अंतर्गत अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची सिंचीत व असिंचीत निवाडयाकरीता व बाधीत शेतकऱ्यांना उचीत मोबदला मिळण्याकरीता मा. उपविभागीय कार्यालय, उमरेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. दिनांक 12/06/2023 रोज सोमवारला सांयकाळी 4.00 वाजता मौजा मकरधोकडा, बोपेश्वर, दहेगाव, कटारा आणि हेवती या गावातील शेतजमीनी वेकोली उमरेड अंतर्गत खाणी करीता अधिग्रहण केलेली असून सिंचीत व असिंचीत शेतजमीनीचे दर ठरलेले असून सिंचीत जमीनीला 10.00 लक्ष रूपये व असिंचीत जमीनीला 8.00 लक्ष रूपये प्रती एकर देण्यात येत आहेत. परंतु वरील गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनी सिंचीत असून सात बाऱ्यावर असिचीत असल्याची नोंद असल्यामुळे मौजा मकरधोकडा, बोपेश्वर,
दहेगाव, कटारा आणि हेवती या गावातील वेकोली अंतर्गत अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची सिंचीत व असिंचीत जमीनीचा सर्व्हे करून सातबाऱ्यावर नोंदणी करण्यात आलेली नाही. सदर गावातील बरेच शेतकरी मकरधोकडा, पारडगाव व सायकि कालव्यातून मागील 30-40 वर्षापासून शेतजमीन ओलीत करीत आहेत. वरील गावातील शेतकऱ्यांना वेकोली कडून शेतजमीनीचा
उचीत मोबदला मिळण्याकरीता व शेतकऱ्यांच्या सात बाऱ्यावर सर्व्हे करून नोंदणी करण्यात याव्या तसेच सर्व्हे व शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नोंदणी होत नाही तोपर्यंत वेकोली अधिकाऱ्यांनी सदर गावातील शेतकऱ्यांना शेतजमीनीकरीता बळजबरी करण्यात येवू नये तसेच 5 दिवसात सर्व्हे करून अहवाल मा. उपविभागीय अधिकारी (राजस्व) उमरेड यांच्याकडे सादर करावा असे निर्देश मा.श्री सुधीरजी पारवे, माजी आमदार उमरेड विधानसभा क्षेत्र यांनी बैठकीत दिले. आयोजित बैठकीला मा. श्री विद्यासागरजी चव्हाण उपविभागीय अधिकारी (राजस्व) उमरेड, मा. श्री रूपचंदजी कडू सभापती कृषि उत्पन्न बाजार समीती उमरेड, मा. श्री राजकुमारजी कोहपरे, उपसभापती कृषि उत्पन्न बाजार समीती उमरेड, मा. श्री संदीपजी हुलके संचालक कृषि उत्पन्न बाजार समीती उमरेड, मा. श्री भिकाजी भोयर संचालक कृषि उत्पन्न बाजार समीती उमरेड, मा. श्री अजयजी रासनगटट्टुवार वेकोली अधिकारी मा. श्री मनोजजी वाडे नायब तहसीलदार उमरेड तसेच संबंधीत तलाठी व मौजा मकरधोकडा, बोपेश्वर दहेगाव कटारा आणि हेवती या गावातील बाधीत शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अशी माहिती नंदकिशोर समरीत, स्विय सहाय्यक माजी आमदार श्री सुधीरजी पारवे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular