उमरेड प्रतिनिधी
दिनांक 18/06/2023 रोज रविवारला भिवापूर तालुक्यातील शिवनफड, वाकेश्वर, मा. सोमनाडा, वासी, भागेबोरी, मोखाडा, मेढा या गावातील कोल्हापूरी बंधारे यांचे उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ पारवे यांचा हस्ते 12 कोटी 64 लक्ष रुपयाचे भूमिपूजन करण्यात आले.
तसेच वासी येथे पूर संरक्षण काम याचे पण भूमिपूजन करण्यात आले.
तसेच शेतकऱ्यांन सोबत चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेतले व अधिकारी यांना चांगला पद्धतीचे बांधकाम करून घेण्याचे निर्देश दिले तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची या बांधकाम सुरु असतांना अडचण होऊ नये असे ही या वेळी सांगितले व उर्वरित कामांचे प्रस्ताव तयार करण्यास सांगितले.
या वेळी प. स. उपसभापती राहुल मसराम, प. स. सदस्य ममता शेंडे, सभापती बाळू इंगोले, उपसभापती चंद्रशेखर ढाकूणकर, संचालक जगन गावंडे, मिलिंद राऊत, रजत चांभारे, सुशील मेश्राम, सुरेखा गोडे, माजी उपसभापती राजेंद्र गारघाटे, सरपंच पार्बता लोडे, शारदा मोटघरे, मनीषा गेडेकर, मनोरमा धुर्वे, रंजना वाकडे, आशा वाघ, उपसरपंच प्रकाश पाटील, यशोदा पडोळे, नारायण गोडे, चंदा गावंडे, राजेंद्र डोये, अनिल देवाळे, तसेच
दिवाकर माळवे, बालाजी मुंगले, रवी मालवंडे, बाबा मानकर, रवी लोडे तसेच ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व संबधित अधिकारी उपस्थित होते.