Friday, February 3, 2023
Homeनागपुरआमदार जयस्वाल यांनी तात्काळ केली पाहणी; तहसिलदारांना दिले हे निर्देश

आमदार जयस्वाल यांनी तात्काळ केली पाहणी; तहसिलदारांना दिले हे निर्देशसततधार पावसामूळे पारशिवनी तालूक्यातील कांद्री-टेकाडी,गोंडेगाव येथिल शेतकर्‍यांच्या शेतात पाणी भरले होते.यामुळे येथिल शेतकर्‍यांच्या पिकाचे नूकसान झाले.तसेच येथिल गुरुद्वार ते खदान येथे जाणार्‍या रसत्यावरुन पाणी वाहत असल्याने नागरिकांना जाण्या येण्याचा मार्ग बंद झाला होता.याची माहीती मिळताच आमदार आशिष जयस्वाल यांनी काल १० ऑगस्टला तात्काळ या ठिकाणी भेट देवून शेतात शिरलेल्या पाण्याची पाहणी केली.तसेच रस्त्यावरून वाहणार्‍या पाण्याची पाहणी करुन शेतकरी व नागरिकांशी चर्चा केली.रस्त्यावरील पाणी वाहत असल्याने तेथिल रस्ता मार्ग बंद झालेला होता.त्या रसत्यावर मोठी पायली टाकणे तसेच तात्काळ रस्ता सुरु करुन शेतकर्‍यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश आमदार जयस्वाल यांनी तहसिलदार प्रसांत सांगडे व संबंधित अधिकांर्‍याना फोनद्वारे दिले आहेत.

यावेळी जितेंद्र चव्हान,त्रिभूवन सिंग,अतुल हजारे,नहरहरी पोटभरे,सरपंच कांद्री बलवंत पडोले,मनोज सिंग,विरेंद्र सिंग,राजेश झा,रुषी नागरकर,नरेश पोटभरे,श्रिराम राहीले,बंडू सांगोडे,रमेश पुरी यांचेसह शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular

03/02/2023

02/02/2023

01/02/2023

31/01/2023