भद्रावती
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे दि.२५ व २६ डिसेंबर रोजी नागपूर येथे पार पडणारे राष्ट्रीय अधिवेशन भद्रावती येथील लोकमान्य विद्यालयात आभासी पद्धतीने पार पडणार आहे.

25 डिसेंबरला संपूर्ण भारतातल्या जिल्हा व नगर स्तरावर प्रत्यक्ष व आभासी पद्धतीने हे अधिवेशन संपन्न होणार आहे. या राष्ट्रीय अधिवेशनात ABVP चे संस्थापक अध्यक्ष प्रा. यशवंतराव केळकर राष्ट्रीय युवा पुरस्कार 2020 हा मनीष कुमार (Back to Village) या प्रकल्पाकरिता मिळाला आहे. मनीष कुमार हे वैशाली, बिहार येथील राहणार असून सेंद्रिय शेतीवर याचे संशोधन कार्य सुरू आहे.
या दोन दिवसीय अधिवेशनात विविध सत्र चालणार आहे. यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020), COVID PANDEMIC काळ, देशातील सामाजिक विषयावर, प्रस्ताव, चर्चा, अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष, महामंत्री, व कार्यकारणी घोषणा होणार आहे.तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ५ ठिकाणी ऑनलाइन अधिवेशन होणार आहे. त्यात भद्रावती नगराचा समावेश आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम भद्रावती मध्ये लोकमान्य विद्यालयात दुपारी २ ते ७ वेळात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन अभाविपच्या स्थानिक शाखेतर्फे करण्यात आले आहे.