सेलू: हिंगणी येथे सलून ब्युटीपार्लर असोसिएशनच्या वतीने श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी शनिवारी 23 ऑक्टोंबर रोजी साजरी करण्यात आली.
संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सव निमित्त 201 दिवे लावून महा आरतीचे आयोजन करण्यात आले होते. सेलू तालुक्यातील विविध ठिकाणी सेलू, हिंगणी, घोराड, केळझर, सिंदी (रेल्वे), दहेगाव या विविध ठिकाणी नगाजी महाराज पुण्यतिथी जयंती साजरी करण्यात आली सर्व भक्तांनी आरतीचा लाभ घेतला सलुन ब्युटी पार्लर असोशियन कार्यकर्ता नाभिक बांधव व महिला उपस्थित होत्या.