सावली/व्याहाड

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार सावली तालुक्यातील मौजा हरांबा येथे दि २५-१२-२०२१ ला दुपारी १२ वा. तालुक्याच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली असून बूथ कमिटीची स्थापना व काँग्रेस सभासद नोंदणीची सुरवात करण्यात आली. हरांबा येथील गुरुदास किसन चरडुके व निलेश रामचंद्र शेंडे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
काँग्रेस पक्षाची विचारधारा प्रत्येक घरात पोहोचावे यासाठी सभासद नोंदणीची सुरुवात करण्यात आली. बालू डोईजड, प्रवीण संतोषवार, रविंद्र बाबुराव चरडुके, यांचे सभासद नोंदणीचे फार्म भरून सुरुवात करण्यात आली.
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहणे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष मंबतूलवार,संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष राकेश गड्डामवर, जीबगावचे सरपंच पुरुषोत्तम चुदरी, उसेगाव चे उपसरपंच सुनील पाल, हरांभा येथील उपसरपंच प्रवीण संतोषवार, बालू डोईजड ग्रामपंचायत सदस्य, मोहन कुणघाडकर,रविंद्र चरडुके, रुमाजी कोरडे उपस्थित होते. निवड करण्यात आलेल्या काँग्रेस बूथ अध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत आले.