ब्रह्मपुरी वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा
ब्रह्मपुरी-

ओडीसा राज्यातून छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्ह्यात काही दिवसा अगोदर वन्य हत्तीच्या कळपाने प्रवेश केला होता मात्र यानंतर गेल्या दोन-तीन दिवसा- आगोदर तीस-पस्तीसच्या संख्येने असलेल्या हत्तीचा कळप देसाईगंज ( वडसा) तालुक्यातील उसेगाव कोंडाळा परिसरात आढळून आल्याने शिवाय आता हा हत्तीचा मोर्चा लागूनच असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा निश्चित करणाऱ्या वैनगंगा नदी पात्रातील ब्रह्मपुरी वन विभागातील क्षेत्राकडे वळत असल्याची चिन्हे दिसत असल्याने ब्रह्मपुरी वन विभागातील उत्तर परिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी पुनम ब्राह्मणे यांनी स्वतः लक्ष वेधून ब्रह्मपुरी विभागातील व वैनगंगा नदीलगत असलेल्या रनमोचन खरकाळा पिंपळगाव बोळेगांव येथील ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलिस पाटील यांच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याच बरोबर ब्रह्मपुरी वन विभागातील अधिकाऱ्यांचे पथक सुद्धा हत्तींच्या कळपावर लक्ष ठेवून नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहेत