गडचांदूर : मो.रफिक शेख –
राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे दिनांक 20 ऑक्टोबर 2021 रोजी चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मिताली सेठी (IAS), डायटचे प्राचार्य डॉ. धनंजय चापले, जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड (माध्यमिक), दिपेंद्र लोखंडे (प्राथमिक) तथा गटशिक्षणाधिकारी विजय परचाके यांचे प्रेरणेतून पांढरपौनी केंद्राची पहिली शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मंगी (बु) येथे संपन्न झाली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन करुन व पुष्पमाला अर्पण करुन शिक्षण परिषदेची सुरुवात सुरुवात करण्यात आली.
केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेच्या उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राम पंचायतीचे सचिव गजानन वंजारे हे होते तर उदघाटक म्हणून केंद्रप्रमुख शेषराव वानखेडे हे होते. कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम (मुख्याध्यापक), अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे शिक्षण समन्वयक किशोर हजारे, उच्चश्रेणी शाळेचे मुख्याध्यापक लिलाधर परचाके, विजय कथले, विनायक धनवलकर, किरण कामडी, प्रमोद धानकुटे, अरविंद तामगाडगे, अनिल पेंढारकर, शंकर वाटेकर, गिरीधर पानघाटे यांचे प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षण परिषदेत NAS (National Achievement Survey) याबाबत सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले. केले. सुपर- 60 मिशन गरुडझेपचे सदस्य गिरीधर पानघाटे यांनी मिशन गरूडझेपची पार्श्वभूमी व या मिशन अंतर्गत राबवायचे उपक्रम व निश्चित कालमर्यादेत साध्य करावयाची ध्येये आणि विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती नुसार वर्गवारी करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच NAS -2021 बाबत प्रश्नांचे स्वरूप, OMR उत्तरपत्रिकेवर घ्यावयाचा सराव याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मराठी, गणित, परिसर अभ्यास आणि इंग्रजी या विषयाचे सखोल मार्गदर्शन केंद्रप्रमुख शेषराव वानखेडे, शंकर वाटेकर पांढरपौनी, गिरीधर पानघाटे, हरदोना (खु), दिवे मॅडम, पांढरपौनी, सुनीता टिपले आर्वी, गुणवंत कोटकर चंदनवाही, सुधीर झाडे मंगी(बु), गटसाधन केंद्राचे विषय साधन व्यक्ती ज्योती गुरनुले व राकेश रामटेके यांनी केले. केंद्रातील एकूण 58 शिक्षक उपस्थित होते. सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला.
शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विषय शिक्षक सुधीर झाडे यांनी केले. आणि आभार सहाय्यक शिक्षक मारोती चापले यांनी मानले. शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी श्रीनिवास गोरे, पंडीत पोटावी, शिक्षणप्रेमी शैलाताई जयपाल मडावी तसेच ग्राम पंचायत कर्मचारी नितीन मरसस्कोल्हे, चरणदास चिलकुलवार, दिनेश राठोड, बालाजी मुंडे, सुरेश येमुलवार तथा अनुसयाबाई कुळसंगे व फुलाबाई सिडाम यांनी मोलाचे सहकार्य केले.