Saturday, July 27, 2024
Homeचंद्रपुरसिएसटीपीएसच्या राखेमुळे शेतपीकांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या - आ. किशोर...

सिएसटीपीएसच्या राखेमुळे शेतपीकांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या – आ. किशोर जोरगेवार

◻️▪️हिराई विश्राम गृहात पार पडली अधिका-यांशी बैठक !

चंद्रपूर


◻️
चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्राच्या राख वाहिनींमधुन राख गळती सुरु आहे. ही राख शेतक-यांच्या शेतात जात असुन शेत पीकांचे आणि शेत जमीनींचे मोठे नुकसान होत आहे. हा गंभीर प्रकार असुन ही गळती तात्काळ थांबवत सिएसटीपीएसच्या राखेमुळे शेतपीकांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या अशा सुचना चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएसच्या अधिकाऱ्यांना आज एका बैठकित केल्या आहेत.
▪️◻️विविध विषयांना घेऊन हिराई विश्राम गृहात आमदार जोरगेवार यांनी सिएसटीपीएसच्या अधिका-यांची बैठक बोलावली होती. सदरहु बैठकीत त्यांनी उपरोक्त सूचना केल्या आहे. या बैठकीला सिएसटीपीएसचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार, उपमुख्य अभियंता शाम राठोड, विराज चौधरी, अनिल पुनसे, महेश राजुरकर, अधिक्षक अभियंता मिलींद रामटेके, सचिन भागेवार, दिशेन चौधरी, कामगार कल्यान अधिकारी दिलीप वंजारी, कार्यकारी अभियंता विनोद उरकुडे, अनिल हजारे, सहायक कल्यान अधिकारी राजु धोपटे, अधिक्षक अभियंता महेश पराते, कार्यकारी अभियंता हेमंत लांजेवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार संघटनेचे कार्यकारणी अध्यक्ष हरमन जोसेफ, यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामिण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, मोरवा सरपंच स्नेहा साव, छोटा नागपूरचे उपसरपंच ऋषभ दुपारे, मोरवा उप सरपंच भुषन पिदुरकर, विचोडा ग्रामपंचायत सदस्य संजय बोबडे, यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्यांक विभागाचे शहर अध्यक्ष सलिम शेख, अल्पसंख्याक विभाग युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, युवा नेते अमोल शेंडे, शहर संघटक विश्वजीत शहा, प्रतिक शिवणकर, प्रसिध्दी प्रमुख नकुल वासमवार, करणसिंग बैस, तापोष डे, विलास सोमलवार, राम जंगम, अँड. परमहंस यादव, गौरव जोरगेवार, सतनाम सिंह मिरधा, गणपत कुडे, कालीदास रामटेके, कोसारा माजी सरपंच गुड्डू सिंग, नितिन कार्लेकर, मुन्ना जोगी, राम मेंढे, आनंद रणशूर, कुणाल जोरगेवार, प्रकाश पडाल आदींची उपस्थिती होती. ◻️▪️सिएसटीपीएस येथे काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहे. आलेल्या या तक्रारी आपण प्राथमिकतेने सोडविल्या पाहिजे, मौजा नागपूर(छोटा), विचोडा, चारगाव, मोरवा, ताडाळी, पडोली येथील शेतकऱ्यांच्या शेतालगत चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रची नवीन राख वाहीणी आहे. ह्या वाहिनी मधून राख गळती होऊन शेतालगत राखेचा ढिगारा लागला आहे. परिणामी शेतपीकांचे व जमीनीचे नुकसान होत आहे. त्यामुळे याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, छोटा नागपूर व विचोडा या गावातील नाला सिएसटीपीएसच्या अँश बंड मधून येणाऱ्या राखेमुळे पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात सदरहु नाल्यातील पाणी परिसरात साचते आणि त्यानंतर येथील राख व घाण पाणी शेतकर्यांच्या शेतात जात असून पीकांची नासाडी होत आहे .याकडे लक्ष देऊन सदर नाला स्वच्छ करण्यात यावा, छोटा नागपूर, विचोडा येथील पुलाचे काम तात्काळ करण्यात यावे. कामगारांना इएसआयसी योजनेचा लाभ देण्यात यावा, कंत्राटदारांनी सर्व कंत्राटी कामगारांचे पीएफ प्रत्येक महिन्याला त्यांच्या पिएफ खात्यात जमा करावे, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, तर्फे कंत्राटदारांना देण्यात आलेले काम पूर्ण तपासून व निर्धारित लक्ष पूर्ण झाल्याची तपासणी करून कंत्राटदारांना त्यांचे देयके देण्यात यावे, कंत्राटी कामगारांना त्यांच्या सोपविलेल्या तांत्रिक कामानुसार त्यांना कुशल, अर्धकुशल व अकुशल श्रेणी नुसार वेतन देण्यात यावे, संपूर्ण कंत्राटी कामगारांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत वेतन देण्यात यावे, कंत्राट मुदत संपायच्या २ महिन्या अगोदर नवीन कंत्राट पुनर्प्रक्रिया सुरु करण्यात यावी, कंत्राटी कामगारांच्या समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी सहायक कामगार आयुक्त, चंद्रपूर यांच्या समवेत प्रत्येक महिन्यात बैठकीचे आयोजन करण्यात यावे, कंत्राटी कामगारांना कुठल्याही अपघातात अपंगत्व आल्यास त्यांना त्यांच्या सोयीचे काम देण्यात यावे, पोलिस व्हेरिफिकेशनची सहा महिन्यांची अट रद्द करून दोन वर्षांनी सदर प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात यावी. अशा सुचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएसच्या अधिका-यांना केल्या आहे. यावेळी छोटा नागपूर विचोडा येथील अँश वाहिनीतील गळती मुळे बंद झालेल्या नाल्याचे खोलीकरण तात्काळ करण्यात येणार असल्याचे यावेळी सिएसटीपीएसच्या अधिका-यांनी या वेळी सांगितले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular