सावलीत पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करा, सावली वासीयांची मागणी
सावली: सावली येथे पोलीस स्टेशन असून सावली तालुका हा चंद्रपूर जिल्यात अतिसंवेदनशील तालुका अशी सावलीची ओळख आहे,सावली तालूका हा नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्या सीमेवर असून सावली तालुक्यात 50 ग्रामपंचायती चा समावेश आहे,चंद्रपूर जिल्हा हा दारूबंदीचा जिल्हा आहे,
आणि सावली पोलीस स्टेशन अंतर्गत आज पर्यंत l.c. b. च्या मोठया कारवाया झाल्या आहेत,मग सामान्य जनतेत प्रश्न निर्माण होतो की सावली पोलीस स्टेशन हद्दीत चंद्रपूर l. C. b. पथक कारवाई करते मग सावली पोलीस यांचेवर प्रश्न चिन्ह निर्माण होतो,शासन दरबारी सावली तालुका हा संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो या सावली तालुका अंतर्गत पाथरी व सावली अशी दोन पोलीस स्टेशन कार्यरत आहे पाथरी येथील पोलीस स्टेशन उपनिरीक्षक दर्जाचे असून सावली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दर्जाचे आहे मात्र सावली तालुक्याचा पूर्व इतिहास बघता शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याची नितांत गरज असल्याचे सर्वत्र बोलले जाते आहे
सावली तालुक्यात आता राजकीय वातावरण तापू लागले आहे येत्या 15 जानेवारीला सावली तालुक्यातील 50 ग्राम पंचायत च्या निवडणूका होत आहेत, सावली तालुक्यात शांतता व सुव्यववस्था अबाधित राखण्यासाठी,निवडणूक काळात अवैद्य दारूचा होणारा पुरवठा रोखण्यासाठी सावली पोलीस स्टेशन येथे पोलीस निरक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी सावली वासीय जनता व विविध सामाजिक व राजकीय संघटना यांचे कडून होत आहे.