स्मार्ट ग्राम मंगी (बू ) येथे गोंडी धर्मगुरू पाहांदि पारि लिंगो जन्मोस्तव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
गडचांदूर :- समाज संघटित करायला समाज शिक्षित होणे काळाची गरज आहे. समाज संघटित होणे म्हणजे समाज परिवर्तनाची पहिली पायरी आहे.
असे प्रतिपादन गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी केले.
ते राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम मंगी (बू) येथे आयोजित गोंडी धर्मगुरू पाहांदि पारि लिंगो जन्मोस्तव सोहळा कार्यक्रमात बोलत होते.
शिक्षाणाच्या नव्या पिढीचे कल्याण होते. हे स्पर्धेचे युग आहेत. आता त्यासाठी गावागावात शैक्षणिक वातावरण निर्माण करावे जिवनात यशस्वी निर्माण करायचे असेल.तर महान व्यक्तीचे चरिञ अभ्यासुन त्यातुन मिळणारी स्फुर्ती तुमच्या जिवनाच कल्याण करेल नव्या पिढीची शिक्षणासोबतच समाजाची संस्कृती जोपासण्याची गरज आहेत.असे प्रतिपादन गाेंडवाना गणतंञ पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पा जुमनाके यांनी केले.
या वेळी मंचावर गोंडवाना गणतंत्र पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी, गटशिक्षणाधिकारी विजय परचाके, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, गोंडवाना महासभेचे अध्यक्ष हरजु पा. सिडाम गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव अब्दुल जमीर भाई, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पुसाम, राजुरा तालुका गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष अरुण उदे, जिवती तालुका गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष ममताजी जाधव, राजुरा तालुका गोंडवाना गणतंत्र पार्टीचे उपाध्यक्ष प्रकाश येडमे, माजी नगरसेविका राधाताई आत्राम, माजी सरपंच रसिकताई पेंदोर, माजी उपसरपंच वासुदेव चापले, शिक्षक लिंगोराव सोयाम, किसन पा. कोरांगे, तेलंगणा येथील येथील देवराव कोवा, केशवराव परचाके, आसिफाबाद येथील सुधाकर पेंदोर, विनोद आत्राम, संदीप तुमराम, नागेश कोरवता, बापूराव बोबनी, बळवंतराव कोरवता, गोंडी गायक रेला रवी मेश्राम, पोलीस पाटील व्यंकटराव मुंडे, माजी सरपंच सोनबत्तीताई मडावी, ग्रामसेवक गजानन वंजारे माजी ग्रामसेवक मरापे, गावापाटील सोमाजी कोडापे, मोतीराम पेंदोर उपस्थित होते.
या वेळी गावातून मोठ्या उत्साहात गावाकऱ्यांनी रॅली काढून पाहुण्यांचे जंगी स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परुशुराम तोडासाम यांनी तर सूत्रसंचालन मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे व आभार शंकर तोडासे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणपत कोडापे, रामभाऊ तलांडे, शंकर कन्नाके, रामशाव कन्नाके, आनंदराव मडपती, ज्ञानेश्वर आडे, श्रीकृष्ण तोडासाम, व स्मार्ट ग्राम मंगी (बू) गावातील सर्व सगाजणांनी परिश्रम घेतले,