जिवती तालुक्यातील सगणापूर येथील पांदण रस्त्याचे काम चालु असून येथील काम निकृष्ट रस्त्याचे होत असल्याचे संपूर्ण गावकऱ्यानी व उपसरपंच श्री गोविंद मिटपल्ले, माजी सरपंच श्री.बाबू पुल्लेवाड यांनी ठेकेदार यांना वारंवार कळवून ही सदर बाबीकडे ठेकेदार जाणून दुर्लक्ष करत आहे.सदर रस्त्यावर एक मोठा नाला असून नाल्याचा वेग अतिशय वेगवान असून नाल्याला एक पुलिया बनवून चार पाईप लावणे आवश्यक असताना येथे फक्त्त दोनच पाईप लावले असून येथून पाणी पास होणार नाही, तरी येणाऱ्या पावसाळ्यात पूल तुटण्याची भीती गावकऱ्याच्या मनात बेडसावत आहे.
सदर बाबीचा पाठपुरावा करत उपसरपंच श्री. गोविंद मिटपल्ले व माजी सरपंच श्री.बाबू पुल्लेवाड यांनी रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होऊ नये यासाठी प्रतिलीपी म्हूणन सदर रस्त्याची दुरावस्था होत असल्याची तक्रार माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री श्री.हंसराज अहिर, माजी अर्थ व नियोजन मंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार, राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्री.संजय धोटे, पूर्व माजी आमदार श्री.सुदर्शन निमकर,यांना सदर रस्त्याच्या दुरावस्थेबदल कळविले आहे.