Wednesday, July 24, 2024
Homeचंद्रपुरसंजय गांधी निराधार अनुदान योजनेचे २५१ प्रकरण मंजूर

संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे २५१ प्रकरण मंजूर

कमलेश नेवारे, बल्लारपूर ता.प्र

बल्लारपूर /- संजय गांधी निराधार अनुदान योजनेची बैठक २६ फेब्रुवारी रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालय, बल्लारपूर येथील सभागृहात संपन्न झाली. यावेळी सदर योजनेतील सुमारे २५१ लाभार्थ्यांची प्रकरण मंजूर करण्यात आली.
त्यात अपंग, निराधार, विधवा, परित्यगता, अविवाहित, दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण, वृद्ध आदी प्रवर्गातील लाभार्थ्यांचा समावेश आहे. सदर लाभार्थ्यांना तात्काळ या योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुढील कार्यवाही केली जात आहे.
याप्रसंगी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष समीर केने, सचिव नायब तहसीलदार महेंद्र फुलझले, अजय मल्लेलवार, सदस्य वैशाली जोशी, किशोर मोहुर्ले, रमेश पिपरे, अनिल मोरे यांच्या तसेच इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular