ब्रह्मपुरी
आज दि.२५ डिसे.२०२१ ला संपूर्ण देशभर माजी पंतप्रधान श्रध्देय अटल बिहारी जी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा होत आहे. त्या अनुशंगाने भाजपा कार्यालय ब्रह्मपुरी येथे कार्यक्रम साजरा करण्यात आला.
जेष्ठ कार्यकर्ते नागोजी कार यांचे हस्ते अटलजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले
या प्रसंगी प्रा संजय लांबे सर, ओबीसी आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रकाशजी बागमरे यांनी अटलजींच्या जीवनावर तसेच सुशासनावर प्रकाश टाकला..
कार्यक्रमाचे संचालन माजी नगरसेवक तथा नगर महामंत्री श्री मनोज भूपाल यांनी केले व आभार प्रदर्शन विद्यमान नगरसेवक तथा शहर महामंत्री श्री मनोज वठे यांनी केले..
याप्रसंगी कोषाध्यक्ष श्री अरविंद नंदूरकर, साकेत भानारकर, भाजयुमो महामंत्री स्वप्नील अलगदेवें, राहुल सुभेदार, सुशील थारकर, सुरेश बनपूरकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते..
उपस्थित सर्वांनी पुष्पांजली अर्पण अभिवादन केले…