ब्रम्हपुरी
: शिवसेना ब्रम्हपुरी शहर शिष्टमंडळ मा.ना नितीनजी राऊत ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य यांना मुंबई इथे मंत्रालयात भेटून 132 kv टॉवर लाइन ब्रम्हपुरी ते सिंदेवाही ही टॉवर लाईन शेतकऱ्यांच्या जमीनीतून गेलेली आहे त्या मुळे येथील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले व शेती करण्यास अडचण भासत आहे म्हणून ही लाईन शेत z शेप मध्ये न घेता ही सरळ सरकारी खुल्या जागेतून घ्यावे .

त्या मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही या करिता आज मंत्री मोहदयाना निवेदन देण्यात आले या वेळेस शहर प्रमुख नरूभाऊ नरड , माजी तालुका प्रमुख नरेंद्र गाडगीलवार , युवा सेना शहर प्रमुख अमोल माकोडे , आणी इतर कार्यकर्ते उपस्थित होते.