शेगाव बू प्रतिनिधी ..
स्थानिक शेगाव बू च्या हद्दीत येत असलेल्या बोथली ते वहानगाव च्या नॅशनल हायवे रोड जात असलेले तीन चाकी याटो मधून विदेशी दारू पकडण्यात यश मिळाले…
सविस्तर वृत्त असे की आज मिळालेल्या गोपनीय माहिती च्या आधारे शेगाव येथील ठाणेदार श्री सुधीर बोरकुटे यांनी विशेष शक्कल लाऊन विशेष सापळा रचून तीन चाकी वाहनातून चार पेटी विदेशी दारू पकडली आरोपितांनी दारु ऑटोमध्ये विशेष कप्पे बनवून त्यात लपवून ठेवली होती यात.
आरोपी प्रशांत शामराव वरणकर रा .नागपूर तसेच किशोर विनायक निंबुलकर , हडकेश्र्वर नागपूर यांना अटक करून यांच्या कडून विदेशी दारू चार पेटी 70 हजार रुपये दोन मोबाईल संच 9 हजार रुपये , व तीन चाकी गाडी नं mh 31-ds 2869 , 63 हजार रुपये असा एकूण 1लाख 29हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर ही कारवाई सहा.पोलीस अधीक्षक , तथा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनात. येथील ठाणेदार श्री सुधीर बोरकुटे यांच्या नेतृत्वाखाली asi श्री पिरके, पो शी देवा डुकरे , रमेश पाटील बाळासाहेब कामले , आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली