ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ;सिंधी गावातील प्रकार
राजुरा –
जनसामान्य नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे.युवक व्यसनाधीनतेकडे वळू नये रोज सकाळी व सायंकाळी व्यायाम करून आपले आरोग्य सुदृढ बनवावे याकरिता राजुरा तालुका अंतर्गत येत असलेल्या सिंधी या गावात पाच वर्षांपूर्वी शासनाने व्यायाम शाळेकरिता लाखो रुपयांचे साहित्य उपलब्ध करून दिले .परंतु ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे लाखोंचे साहित्य धूळखात असल्याचे विदारक चित्र सिंधी गावात पाहायला मिळत आहे.

सिंधी हे गाव तालुका मुख्यालयापासून २३ किलोमीटर अंतरावर आहे. सिंधी गावातील युवक मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीची तयारी करत असून त्यांना तेवीस किलोमीटर प्रवास करून राजुरा व्यायाम शाळेत आरोग्य सुदृढ करण्याकरिता जावे लागते. गावात व्यायाम शाळेचे साहित्य जिल्हा परिषद शाळेत गेल्या पाच वर्षांपासून धूळखात असून ग्रामपंचायत चे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे .त्यामुळे गावातील युवकांना व्यायाम शाळेचे साहित्य ठेवण्याकरिता इमारत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आशिष झुरमुरे यांच्यासह शेकडो युवकांनी केली आहे.