वरोरा शिक्षक अनिल नौकरकार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अहिल्याबाई होडकर वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तू वाटप करून साजरा केला यावेडी वृद्धाश्रमाच्या संचालिका सोनुबाई येवले व्हिडिओकाँनचे सेवानिवृत्त मानव संसाधन विभाग प्रमुख बंडभाऊ कातोरे व चिमुरचे पोलीस हवलंदार देवतडे उपस्थित होते .
अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रमात शोषित ,पीडित,मानसिकरित्या विकलांग ,अत्याचार झालेल्या 15 ते 17 महिला व पुरुष असून त्यांचा सांभाड करण्याचे काम संचालिका सोनुबाई येवले ह्या मागील 20 वशापासून करीत आहे . त्याचा या कामात सहभाग म्हणून अनेक वरोरावासी आपला वाढदिवस इथे साजरा करून त्याचा या कामात जीवनावश्यक वस्तूंच्या रुपात भेट देत असतात,त्याच्या या कार्यात सहभाग म्हणून शिक्षक अनिल सरांनीही आपल्या वाढदिवस या आश्रमात करून एक सामाजिक डायत्व जपले आहे ।