भद्रावती: दरवर्षी भद्रावती तालुक्यातील हजारो हेक्टरवरील शेतमालाचे नुकसान वन्यप्राणी करीत असते. या वन्यप्राण्यांपासून शेतमालाचे रक्षण करण्यासाठी तालुक्यातील शेतकरी नवनविन उपायोजना शोधत असते.भद्रावती तालुक्यातील मुरसा,चिरादेवी,कोच्ची, घोनाड,आदी परिसरातील शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांपासून आपल्या शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून एक अनोखा उपाय अमंलनात आणलेला आहे.

या शेतकऱ्यांसाठी आपल्या शेताच्या बांधावर कुंपणासोबतच जून्या साड्या,चादर,जुनी पातळ, आदी कापड वस्त्र लावलेले आहे. विशेष म्हणजे हा उपाय काम करीत असून जंगली खानपंदाचा उपद्रव कमी झाला आहेंं.शेताच्या संभोवताल कूंपनसोबतच रंगीबेरंगी कपडाचा वापर केल्यामुळे वन्यप्राणी शेतात घुसन्यास घाबरतात.काही प्राण्यांनी शेतात शिरण्याचा प्रयत्न केल्यास या रंगबेरंगी कपड्यामुळे शेतात समोर जाता येत नाही.व एखाद्या प्राण्याने खुसण्याचा प्रयत्न केल्यास सदर लावलेले कापड वन्यप्राण्यांचा चहऱ्याला गुंडाळतात त्यामुळे ते घाबरून परत शेताकडे निरकत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.या उपाय योजनेच्या फायदा झाला असून वन्य प्राण्यांचा त्रास कमी झाला आल्यासाचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.