भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांच्याकडे मागणी
गडचांदुर- मो.रफिक शेख –
कोरपना तालुक्यात वनविभागामार्फ़त येणारे अनेक कामे प्रलंबित आहेत,त्यामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे त्याअनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी उपवनसंरक्षक,मध्य चांदा वनविभाग अरविंद मुंढे यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले.
यामध्ये प्रामुख्याने डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी योजने अंतर्गत जास्तीत जास्त ग्रामपंचायतींचा समावेश करणे जेणेकरून सदर योजनेतील योजनांचा लाभ शेतकरी व नागरिकांना मिळेल,वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांतील झालेली नुकसानभरपाईचे अनुदान देण्यात यावे,नारंडा येथील प्रस्तावित वनउद्यानाला निसर्ग पर्यटन आराखडयात समाविष्ठ करणे, नारंडा येथील वाढीव पाणी पुरवठा योजनेला वनविभागाच्या जागेवरून पाईपलाईन टाकण्यासाठी नाहकरत देणे, बोरगाव (इरई) येथील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून संरक्षणाकरिता सोलार बॅटरी मशीन काटेरी तार मंजूर करणे इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले,यासर्व विषयांवर आपण उचित कार्यवाही करू असे आश्वासन उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी यावेळी दिले.